Baby Names who born in Shravan Month : श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शंकराची म्हणजे शिवाची आराधना केली जाते. अनेक शिवभक्त या महिन्यात शिवशंकरासाठी उपवास करतात. शिवाची अनेक नावे आहेत. श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळाचे नाव तुम्ही शिवशंकराच्या नावावरून ठेवू शकता. आज आपण शंकराची काही नावे जाणून घेणार आहोत.

शिवांश

जर तुम्हाला तुमच्या बाळाचे नाव ‘श’ या अक्षरावरून ठेवायचे असेल, तर तुम्ही शिवांश नाव ठेवू शकता. शिवांश या शब्दाचा अर्थ शिवाचा अंश म्हणजेच शिवापासून निर्मित झालेली व्यक्ती.

आशुतोष

जर ‘अ’ या अक्षरावरून मुलाचे नाव ठेवायचे असेल, तर तुम्ही मुलाचे आशुतोष नाव ठेवू शकता. आशुतोष म्हणजे जी व्यक्ती लगेच तुमची इच्छा पूर्ण करते.

रुद्र

रुद्र हे शिवशंकराचे सर्वांत प्रचलित नाव आहे. मुलाचे नाव रुद्र ठेवल्यामुळे तुमच्या मुलावर कायम शंकराची कृपा राहील. वाईट गोष्टींचा विनाश करणाऱ्याला रुद्र म्हणतात. श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळाचे नाव तुम्ही रुद्र ठेवू शकता.

हेही वाचा : Rakshabandhan 2023 : प्रत्येक भावाने बहिणीसाठी करावीत ‘ही’ पाच कामे; जाणून घ्या …

महेश

महेश हे शिवशंकराचे सर्वांत प्रसिद्ध नाव आहे. जर श्रावण महिन्यात बाळाचा जन्म झाला असेल, तर तुम्ही बाळाचे नाव महेश ठेवू शकता. महेश या शब्दाचा अर्थ महान शासक होय.

चत्रेश

जर तुम्ही बाळाचे हटके नाव शोधत असाल, तर तुम्ही चत्रेश नाव ठेवू शकता. चत्रेश हे तेलगू नाव आहे. दक्षिण भारतात या नावाने शिवशंकराला संबोधले जाते.

अनघ

श्रावण महिन्याच जन्मलेल्या बाळाचे नाव तुम्ही अनघही ठेवू शकता. अनघ या शब्दाचा अर्थ होतो पवित्र किंवा पुण्य. हे नाव खूप हटके आहे आणि शिवशंकराच्या नावांपैकी एक चांगले नाव आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader