ऑफिसमध्ये तासन्तास काम केल्याने आणि सतत त्याच पोझिशनमध्ये बसल्याने तुमच्या पाठीत दुखायला लागते. तर कधी कधी वेदना एवढ्या प्रमाणात वाढतात की आपण काही कारणाने थोडेसे वाकले तरी शरीर तुटल्यासारखे वाटते. ८ ते ९ तास काम करत राहिल्याने अनेकांना पाठदुखी त्रास सुरू झाला आहे. काही लोकं पाठदुखीच्या समस्येकडे असे दुर्लक्ष करतात की जणू काही झालेच नाही, परंतु तुम्हाला माहित आहे का पाठदुखीची समस्या दीर्घकाळ राहणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
पाठदुखी का होते?
सारखे सारखे वाकून काम केल्याने किंवा सारखे वाकल्याने सुध्दा पाठीमधले स्नायु ताणले जातात आणि त्यामुळे मग पाठीचा त्रास होवुन पाठीचे दुखणे तोंडवर काढण्यास सुरूवात होते. खेळताना किंवा प्रवास करताना वारंवार धक्के बसल्याने अनेक वेळा पाठीच्या कण्याला त्रास होतो, ज्यामुळे पाठदुखी उद्भवू शकते. तसेच जास्त मानसिक ताण आणि थकवा जाणवल्यास आपल्या पाठीचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे पाठदुखी होते. अनेक वेळा लोकं रात्री झोपताना पाय दुमडून झोपतात. यात काही लोकांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे झोपल्याने आराम मिळतो, परंतु अशा प्रकारे झोपल्याने तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो रात्री सरळ झोपण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर प्रेगनेन्सी मध्ये सुध्दा पाठ दुखते, गरोदरपणामध्ये आपल्या शरीरात विविध बदल होतात. मग अशा वेळेस पाठ सुध्दा दुखते या काळात जास्त वेळ बसण्यात आले किंवा जास्त चालले तरी पाठीला ताण पडतो आणि मग पाठ दुखते. तर यातून आराम मिळण्यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
या उपायांनी पाठदुखीपासून मिळेल आराम
तुमची पाठ सरळ ठेवा
वाटेत कुठेही चालताना किंवा कुठेही बसताना, पाठ सरळ आहे का याकडे लक्ष द्या. विशेषतः जी लोकं ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात त्यांनी सरळ स्थितीत बसावे, कारण ऑफिसमध्ये अधिक वेळ काम करत राहिल्याने तुमची पाठ दुखू शकते त्यामुळे ऑफिस मध्ये काम करताना सरळ स्थितीत बसावे.
पाठदुखीचा त्रास असल्यानं व्यायाम करू नका
तुम्ही स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करत असाल, तर असा कोणताही व्यायाम करू नका ज्यामध्ये तुम्हाला पुढे झुकावे लागेल. जर तुम्हाला तीव्र पाठदुखी असेल तर काही दिवस व्यायामातून ब्रेक घ्या.
ऑफिसमध्ये कामाच्या वेळात थोडा ब्रेक घेत रहा
ऑफिसमध्ये अनेक लोकांना खुर्चीत बसून अधिक वेळ काम करत राहिल्याने पाठदुखीच त्रास सुरू झाला आहे. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्हाला किमान एक तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नसाल तर तुमच्या केबिनमधून ऑफिसमध्ये फेरी मारत रहा. याने तुमच्या ऑफिसमधील लोकांशी मैत्रीही होईल आणि पाठदुखीपासूनही आराम मिळेल.
जड वस्तू उचलू नका
कोणतीही जड वस्तू उचलू नका. जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर आधी गुडघे वाकवून मग ती वस्तू उचलावी. असे केल्याने सर्व भार कंबरेवर जाण्याऐवजी गुडघ्यावर येईल. असे केल्याने पाठदुखीचा त्रास उद्भवणार नाही.
पौष्टिक आहार घ्या
व्हिटॅमिन डी3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार आहार खात असाल तर त्यात माशांचा नक्कीच समावेश करा. माशांमध्ये असे काही पोषक तत्व असतात जे हाडांसाठी खूप फायदेशीर असतात.