श्वासाची दुर्गंधी हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेच पण त्याचबरोबर लोकांसाठी लाजिरवाणे देखील आहे. श्वासाची दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की हिरड्यांचे आजार, प्लेक आणि टार्टर, जिभेवर दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू, विशिष्ट पदार्थांचे सेवन, अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखू इ. तोंडाची दुर्गंधी ही सल्फर आणि केटोन्स सारख्या रेणूंमुळे, खाल्लेल्या अन्नामुळे आणि काही औषधांमुळे येऊ शकते. रात्रभर तोंडात राहणारे अन्नाचे कण जीवाणूंमध्ये बदलतात आणि श्वासाला दुर्गंधी निर्माण करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलच्या आहारतज्ञ डॉ. प्रीती नागर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, अनेकदा लोकांमध्ये वावरताना आणि मीटिंगमध्ये तुमचा श्वास ताजा ठेवणे महत्त्वाचे आहे. दुर्गंधीमुळे संभाषणावर परिणाम होतो. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी, लोक अनेकदा दिवसातून दोनदा ब्रश करतात, जीभ स्वच्छ करतात, माउथवॉश वापरतात, तरीही त्यांची श्वासाची दुर्गंधी दूर होत नाही.

जे लोक लोकांशी खूप संवाद साधतात आणि त्यांच्याशी बोलायचे असते, त्यांच्या श्वासाची दुर्गंधी आल्यास त्यांच्या मनात संकोच निर्माण होऊ शकतो. श्वासाच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला अनेकदा लाज वाटत असेल तर ती दूर करण्यासाठी काही खास टिप्स वापरून पाहा. असे काही घरगुती उपाय आहेत ज्याचा वापर करून तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकता.

दह्याने दूर करा श्वासाची दुर्गंधी

हैदराबादचे यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ दिलीप गुडे यांनी सांगितले की, “दही खाल्ल्याने तोंडातील हायड्रोजन सल्फाइडची पातळी कमी होते. दही हे व्हिटॅमिन डी समृद्ध नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दह्याचे सेवन करा.”

फळे आणि भाज्यांचे सेवन करा

श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी काही भाज्या आणि फळे जास्त फायबर असलेल्या खा. ब्लॅकबेरी आणि लिंबू सारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने श्वासाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत होईल.

हेही वाचा – लाकडी चमच्यापासून ‘स्नोड्रॉप’पर्यंत, ‘या’ आहेत जगभरातील Valentine’s Dayच्या अद्वितीय परंपरा

ओवा चघळा

“कार्ब्स आणि प्रोटीन जे दातांमध्ये अडकलेले अन्न बाहेर काढण्यास मदत करतात श्वासाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत करतात. तसेच आहारात ओवा चघळल्याने सूक्ष्मजीवांच्या वाढीस तोंडावाटे लढण्यास मदत होईल,” असे डॉ गुडे यांनीद इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.

शरीर हायड्रेटेड ठेवा

श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी, अधिक पाणी प्या. डॉ.नगर यांच्या म्हणण्यानुसार, जास्त पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणूं आणि तोंडात अडकलेले अन्नाचे कण नाहीसे होऊ शकतात. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने तोंड कोरडे होण्यास प्रतिबंध होतो आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते.

हेही वाचा – विषाणुजन्य तापाच्या संसर्गातून बरे होऊनही तुमचा खोकला जात नाही का? जाणून घ्या काय सांगतात डॉक्ट

या पदार्थांचे सेवन करा

काकडी, गाजर, केळी, हिरवा चहा, आले, हळद, नाशपाती, सफरचंद आणि सेलेरी हे सर्व पदार्थ लाळ निर्माण करण्यास मदत करतात. या पदार्थांचे सेवन करा आणि श्वासाची दुर्गंधी दूर होईल.

खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा


जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा येत असेल तर जेवल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा. श्वासाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad breath after brushing try these special tips the bad smell will disappear snk
Show comments