सध्याच्या काळात जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे औषधे घेतात. तसेच, आपल्या करतात. मधुमेह हा खरं तर जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. तुमच्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. बर्‍याच लोकांना मधुमेह झाल्याची माहिती लवकर मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी अधिक वाढतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार, जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर तुमच्या तोंडाभोवती काही लक्षणे दिसू शकतात. गुरुग्राम येथील आर्टेमिस हॉस्पिटलमधील चीफ एंडोक्राइनोलॉजी, डॉ. धीरज कपूर यांनी सांगितले की मधुमेह हा एक असा रोग आहे ज्यामध्ये शरीराच्या सर्व भागांवर परिणाम होतो आणि बहुतेकदा तो तोंडाच्या माध्यमातून ओळखता येतो. मधुमेहामध्ये अनेकदा किडनी आणि इतर अवयवांबद्दल बोललं जातं, पण हा आजार तोंडाशीही निगडित असतो हे आपण विसरतो. व्यायाम आणि चांगला आहार असेल तर मधुमेह आटोक्यात राहतो, पण अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढली, तर दातांची आणि लघवीची तपासणी करावी लागते.

होळीच्या दिवशी खूप गोड खाल्लंय? या आयुर्वेदिक रसांचे सेवन करून कमी करा रक्तातील साखरेचे प्रमाण

जर तुम्हालाही तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत असेल तर तोंडाची तपासणी करणे आवश्यक आहे. याला हॅलिटोसिस असे म्हणतात. रक्तातील साखरेच्या पातळीत बदल झाल्यास तोंडातील दुर्गंधीची समस्या उद्भवते. तसेच, दातांमध्ये पोकळी किंवा काही इन्फेक्शन दिसले तर अशा पेशंटवर दाताची शस्त्रक्रिया करावी लागते.

डॉ. कपूर शेअर सांगतात की, डायबेटिक केटोएसिडोसिस ही मधुमेहाची एक आपत्कालीन स्थिती ज्यामध्ये केटोन घटक तयार होतो. ही एक दुर्गंधी आहे जी सामान्यतः मधुमेही रुग्णांमध्ये आढळते. साखरेची पातळी २५०/३०० पेक्षा जास्त असलेल्या रुग्णांमध्ये, डायबेटिक केटोएसिडोसिस सूचित केले जाऊ शकते. केटोन्स आहेत की नाही हे तपासण्यासाठी रुग्णाने लघवीची तपासणी करून घ्यावी. मधुमेही रुग्णांमध्ये डायबेटिक केटोएसिडोसिस आणि हॅलिटोसिस ही चिंताजनक परिस्थिती आहे

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad breath is a symptom of diabetes mouth test will reveal the truth pvp