Bad Breath Smell Home Remedies : तोंडातून घाणेरडा वास येणे किंवा दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे. सकाळी उठल्यानंतर बहुतेकांना ही समस्या जाणवते. त्यात काहींना सकाळी ब्रश केल्यानंतरही या समस्येपासून सुटका मिळवता येत नाही. काहींच्या श्वासाला कांदा-लसूण अन्न खाल्ल्यानंतर दुर्गंधी येते. अशा परिस्थितीत कोणाशी समोरासमोर बोलताना खूप लाज वाटते.
थोडक्यात, ही समस्या तुम्ही खात असलेले पदार्थ आणि पेयांमुळेच होते. कारण- अन्नाचे कण दातांमध्ये अडकतात आणि त्यामुळेच तोंडाला दुर्गंधी येते. जर तुम्हालाही अशाच प्रकारचा त्रास होत असेल आणि त्यामुळे तु्म्हाला बोलताना कोणाच्या जवळ जाणे टाळावे लागत असेल, तर खालील टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर आहेत.
कारण- या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही काही सेकंदांत तोंडातील दुर्गंधीचा त्रास कमी करू शकता.
तोंडातील दुर्गंधी ९० सेकंदांत होईल नाहीशी
सर्वप्रथम काकडीचे फक्त दोन ते तीन छोटे तुकडे घ्या. त्यानंतर श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी काकडीचे तुकडे तोंडाच्या आतील वरच्या भागावर जिभेच्या मदतीने ९० सेकंद चिकटवून ठेवा. त्यानंतर तुम्ही ते थुंकू शकता. त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काकडीचे आणखी एक किंवा दोन तुकडे खाऊ शकता.
यामुळे काय होईल?
काही संशोधनानुसार, काकडीत अनेक प्रकारचे फायटोकेमिकल्स असतात. हे फायटोकेमिकल्स श्वासाची दुर्गंधी निर्माण करण्यास कारणीभूत जीवाणू नष्ट करण्यात मदत करू शकतात.
त्याशिवाय काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तोंड कोरडे पडण्याची समस्या कमी होते. कारण- तोंड कोरडे पडल्याने श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास वाढतो. त्यामुळे काकडीबरोबर तुम्ही काही मिनिटांनी सतत पाणी प्यायले पाहिजे.
ही अतिशय सोपी युक्ती वापरून तुम्ही ९० सेकंदांत तोंडातील दुर्गंधीची समस्या दूर करू शकता. त्याशिवाय काकडी तुमच्या आरोग्याला अनेक दृष्टींनी फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत हे सर्व फायदे मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारातही काकडीचा समावेश करू शकता.