शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल हृदयासंबंधी आजारांना आमंत्रण देते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे सर्वात मोठे कारण बिघडलेली जीवनशैली आहे. परंतु ही समस्या अनुवांशिक किंवा शरीरात आधीच असलेल्या आजार किंवा औषधे यामुळे देखील असू शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका, मधुमेह यांसारख्या आजारांना बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. डॉक्टर अनेकदा कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी औषधे लिहून देतात, परंतु असे पदार्थ आहेत जे नैसर्गिकरित्या तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करू शकतात.
२० वर्षांखालील आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल
MyClevelandClinic च्या मते, कोलेस्टेरॉलची पातळी वय आणि लिंगानुसार बदलू शकते. १९ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सामान्य व्यक्तीचे एकूण कोलेस्टेरॉल १७० पेक्षा कमी असावे. त्याच वेळी, अशा व्यक्तीचे नॉन-एचडीएल १२० पेक्षा कमी, एलडीएल ११० पेक्षा कमी आणि एचडीएल ४५ पेक्षा जास्त असावे. परंतु जर व्यक्तीचे वय २० पेक्षा जास्त असेल तर एकूण कोलेस्ट्रॉल १२५ ते २०० च्या दरम्यान, नॉन- एचडीएल १२० च्या खाली, एलडीएल १०० च्या खाली असावे. तर एचडीएल ६० किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
( हे ही वाचा: हिवाळ्यात ‘या’ ३ आजारांचा होतो सर्वाधिक त्रास; आतापासूनच सावध व्हा, नाहीतर उद्भवेल गंभीर समस्या)
धण्याचे सेवन करावे
दररोज धण्याचे पाणी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. हे पाणी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, यासाठी सर्वात आधी पाणी घ्या आणि ते चांगले उकळवा. त्यानंतर त्यात धणे टाका. दोन्ही एकत्र मिक्स करा आणि नंतर रात्रभर थंड करण्यासाठी ठेवा. त्याचे फिल्टर केलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
हळदीचे सेवन
हळदीच्या मदतीने तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठलेली चरबी कमी करता येते. हळदीमध्ये एंटीबैक्टीरियल गुणधर्म देखील असतात. रोज भाज्यांमध्ये हळदीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी तुम्ही एक ग्लास हळदीचे दूध देखील पिऊ शकता.
( हे ही वाचा: यूरिक अॅसिड वाढल्यास शरीर देऊ लागते संकेत; गंभीर आजार होण्यापूर्वी करा ‘हे’ उपाय)
ग्रीन टी चे सेवन
दररोज एक कप ग्रीन टी उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे तुमच्या शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
फायबरचे सेवन
ओट्स, तांदूळ, फळे, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मटार, शेंगा यांसारख्या पदार्थांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.