ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रह नक्षत्रांचा जीवनावर परिणाम होत असतो. ग्रहांच्या दशा खराब असल्यास त्याचे शुभ अशुभ परिणाम जाणवतात. त्यामुळे जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. राहु, केतु, शनि आणि मंगळाच्या महादशेत हा त्रास आणखी जाणवतो. महादशा सुरु असताना त्यातील अंर्तदशाही महत्वाची असते. राहू-केतू यांना ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानले जातात. व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतूमुळे कालसर्प योग तयार होतो. असेही मानले जाते की, राहू-केतूची स्थिती व्यक्तीसाठी अनुकूल नसते. त्यामुळे जीवनात अनेक समस्या आणि प्रत्येक कामात अडथळे येतात. या सर्व गोष्टींमुळे तणाव इतका वाढतो की परिस्थिती हाताळणे कठीण होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहू-केतूचे नाव ऐकताच लोक घाबरायला लागतात. जर तुम्हीही राहू-केतूच्या अशुभ प्रभावाने त्रस्त असाल तर राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

राहूची अशुभ स्थिती टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील उपाय

  • राहूची अशुभ स्थिती टाळण्यासाठी शिवलिंगाचा जलाभिषेक नियमित करावा. एवढेच नाही तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर शिवलिंगासमोर बसून नित्य शिव चालिसाचे पठण करावे. भगवान शिवाची उपासना केल्याने राहूचा प्रभाव कमी होतो.
  • कुंडलीत राहुशी संबंधित दोष असल्यास जाणकारांच्या सल्ल्याने गोमेद असलेले राहू यंत्र धारण करावे. यामुळे राहूचा प्रभावही कमी होतो.
  • राहुच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार शनिवारी उडीद, गरम कपडे, मोहरी, काळी फुले, मोहरी इत्यादी वस्तूंचे दान करावे, अशी मान्यता आहे. याशिवाय रोज सकाळी पाण्यासोबत तुळशीच्या पानांचे सेवन करा.
  • राहुच्या शांतीसाठी, रोज एक जपमाळ ‘ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः’ या बीजमंत्राचा जप करा.

केतुची अशुभ स्थिती टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील उपाय

  • केतूशी संबंधित अशुभ प्रभाव टाळण्यासाठी केतूच्या ‘ॐ स्रां स्रीं स्रौं स: केतवे नम:’ बीज मंत्राचा जप करा.
  • केतूचा प्रभाव टाळण्याचा एक उपाय म्हणजे कुत्रा आणि गायीची सेवा करणे आहे. यामुळे चांगले परिणाम मिळतात अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे.
  • तीळ, काजल, उबदार वस्त्र इत्यादींचे दान केतूच्या स्थितीपासून मुक्ती मिळवण्यासाठीही शुभ मानले जातात. आपल्या क्षमतेनुसार रविवारी दान करा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad condition of rahu ketu in the horoscope impact and remedies rmt