देशातील प्रसीद्ध दुचाकी कंपनी ‘बजाज’ लवकरच आपल्या लोकप्रिय बजाज पल्सर 220एफ ( Bajaj Pulsar 220F ) आणि बजाज अॅव्हेंजर 220 ( Bajaj Avenger 220 ) चं ‘एबीएस’ व्हेरिअंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही बाइक्सचे फोटो लीक झालेत, तसंच त्यांच्या किंमतींबाबतही माहिती समोर आली आहे. कंपनी लवकरच अधिकृतपणे या बाइक लाँच करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ऑटोकारइंडिया’च्या संकेतस्थळानुसार, पल्सर 220एफ एबीएस व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 1.05 लाख रुपये असेल. तर, बजाज अॅव्हेंजर स्ट्रिट 220 आणि क्रूज 220 एबीएस व्हेरिअंटची किंमत 1.02 लाख रुपये असू शकते. एबीएस नसलेल्या पल्सर 220 एफ च्या तुलनेत एबीएस व्हेरिअंटची किंमत 7 हजार 600 रुपये अधिक आहे. तर, एबीएस नसलेल्या अॅव्हेंजरच्या किंमतीच्या तुलनेत एबीएस अॅव्हेंजरची किंमत 6 हजार 700 रुपये अधिक आहे.

एबीएसशिवाय बाइक्समध्ये मॅकेनिकली कोणताच बदल करण्यात आलेला नाही. पल्सर 220एफमध्ये 220cc चं इंजिन आहे. हे इंजिन 8,500rpm वर 20.9hp ची पावर आणि 7,000rpm वर 18.5Nm टॉर्क जनरेट करतं. अॅव्हेंजर 220 बाइकमध्ये सिंगल-सिलेंडर, 220cc इंजिन आहे. हे इंजिन 8,400rpm वर 19hp पावर आणि 7,000rpm वर 17.5Nm टॉर्क जनरेट करतं.