सगळे खाद्यप्रेमी या सणाची आवर्जून वाट पाहत असतात. कारण या दिवशी चवदार आणि खमंग अशा वेगवेगळया दिशेस चाखायला आवर्जून मिळतात. यात मटण, कबाब सारख्या डीशेस सोबतच गोड शेवयासुद्धा असतात. अशीच एक चवदार आणि मसालेदार रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे मटण चॉप्स. ही दिश आवर्जून ईदच्या दिवशी बनवली जाते आणि खाल्लीही जाते. गरम गरम मटण चॉप्स आणि त्यासोबत कांदा, लिंबू हे कॉम्बिनेशनही अनेकांचं आवडतं आहे. मटण चॉप्सच्या रेसिपीसाठी सगळी तयारी तुम्ही आदल्याच दिवशी करून ठेवू शकता. ईदच्या दिवशी तुम्ही काही मिनिटे बेक करून ही डिश सर्व्ह करू शकता.
साहित्य:
मटण चॉप्स – ५०० ग्रॅम
दही – २ चमचे
आले आणि लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
लिंबाचा रस – १ टेबलस्पून
मीठ- १/२ टीस्पून
लाल तिखट – १/२ टीस्पून
धणे पावडर – १/२ टीस्पून
गरम मसाला – १/२ टीस्पून
काळी मिरी – १/२ टीस्पून भाजलेली आणि क्रश केलेली
जिरे – १/२ टीस्पून भाजलेले आणि क्रश केलेले
दालचिनी – १/८ टीस्पून
तेल – २-३ चमचे
कृती
१.एका भांड्यात दही, आले आणि लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट, धणे, गरम मसाला, मिरपूड, जिरे आणि दालचिनी घाला. चांगले मिसळा.
२. तयार झालेल्या मिश्रणामध्ये मटण चॉप्स घाला आणि व्यवस्थितपणे मिक्स करा. पुढे या कमीतकमी ३ तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे. बेकिंग ट्रेमध्ये किंवा पसरट भांड्यात ठेवा.
३. नंतर ह्या मिश्रणावर थोडसं तेलही घाला. आणि. फॉइलने झाकून ठेवा. पुढे १८० डिग्री सेल्सिअसवर २०-२५ मिनिटे प्रीहेटेड ओव्हनमध्ये बेक करावे. ओव्हनमधून बाहेर काढून त्यावरची फॉइल काढावी आणि चॉप्सची बाजू बदलावी.
४. पुन्हा फॉइल झाकून पुढील १०-१५ मिनिटे बेक करावे. मध्ये मध्ये बाजू बदला. अशाप्रकारे चॉप्सतयार आहेत. हे चॉप्स शेजवान चटणी किंवा अन्य कोणत्याही चटणी सोबत सर्व्ह करू शकता.