वीकेंडला घरी खायला काय बनवायचे याचा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडत असेल . विशेषतः मुलांसाठी, प्रत्येक वेळी नवीन पदार्थ काय बनवायचे याचा विचार प्रत्येक आई करत असते. काहीतरी वेगळे आणि नवीन करणे म्हणजे एक नवीन टास्कच असतो. तुम्हालाही दररोज असाच नाश्ता खाण्याचा कंटाळा येत असेल, तर तुमच्यासाठी ही एक नवीन रेसिपी आहे. जे मुलांच्या आवडत्या पदार्थांच्या यादीतील एक बनेल. केळी पॅनकेक्स बनवून तुम्ही तुमच्या मुलांना खायला देऊ शकता. मुलांना ही डिश खूप आवडेल. एवढंच नाही तर त्याला आणखीन पौष्टिक बनविण्यासाठी तुम्ही त्यात ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकता. पॅनकेक्स कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
साहित्य
१ कप मैदा
१ टीस्पून बेकिंग पावडर
१ कप दूध
३ सोललेली आणि मॅश केलेली केळी
३ चमचे साखर
१ डॅश मीठ
१ चमचे रिफाइंड तेल
१ कप नारळाचे दूध
२ फेटलेली अंडी
जाणून घ्या रेसिपी
ही सोपी डिश बनवण्यासाठी एक वाडगा घ्या आणि त्यात केळी सोलून घाला. त्यानंतर चमच्याने किंवा काटाच्या मदतीने केळी मॅश करा. नंतर दुसरी वाटी घ्या त्यात अंडी फोडून फेस येईपर्यंत चांगले फेटून घ्या. एका मोठ्या वाडग्यात, बेकिंग पावडर आणि मीठ मिसळा. नंतर फेटलेल्या अंड्याचे मिश्रण, तेल, दूध आणि नारळाचे दूध घालून मॅश केलेली केळी त्यात घाला. सर्वकाही नीट मिसळा जेणेकरून डोश्यासारखे पीठ तयार होईल. नंतर मध्यम आचेवर तवा गरम करा. जाड पॅनकेक बनवण्यासाठी पिठ समान रीतीने तव्यावर पसरवा. पॅनकेकच्या कडांना तेल लावा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यावर पॅनकेक्स तव्यातून काढा आणि तुमच्या आवडत्या टॉपिंग्ससह सर्व्ह करा. त्यावर तुम्ही चॉकलेटही घालू शकता. ही डिश नक्कीच तुमच्या मुलांना आवडेल.