बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात ८ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण जानेवारी महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. करोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.
(हे ही वाचा: Shani Sade Sati 2022: नवीन वर्षात ‘या’ ४ राशींवर राहील शनिदेवाची साडेसाती!)
सुट्ट्यांची यादी
२ जानेवारी – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
८ जानेवारी – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
९ जानेवारी – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१६ जानेवारी – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२२ जानेवारी- शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींची मुलं वाचन आणि लेखनात मानली जातात हुशार, त्यांना कमी वयात मिळते यश)
२३ जानेवारी – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन (देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद)
३० जानेवारी – रविवार (साप्ताहिक सुट्टी)