May 2022 Bank Holidays: बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण मे महिन्यात महाराष्ट्रात नऊ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण मे महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. करोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

सुट्ट्यांची यादी

१ मे : महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आणि रविवार असल्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.

Weekly Lucky Horoscope 28 October to 3 November 2024
Weekly Lucky Horoscope: लक्ष्मी नारायण राजयोगाने सुरु होईल दिवाळीचा आठवडा! या राशींवर होईल लक्ष्मीची कृपा, अचानक आर्थिक लाभाची शक्यता
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Snack materials became expensive, Snack,
फराळाचे साहित्य महागले
Bhau Beej 2024 Date Time Shubh Muhurat Rituals in Marathi
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ
maharashtra board schools to follow cbse curriculum and schedule
विश्लेषण : एप्रिलमध्ये सुट्टी नाही, मे महिन्यात गृहपाठ… राज्यमंडळाच्या शाळांचे वेळापत्रकही सीबीएसईप्रमाणे?
Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat in Marathi
Diwali Lakshmi Puja Date : लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करताय, ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर? जाणून घ्या तुमच्या शहरानुसार योग्य तारीख अन् मुहूर्त
Weekly Horoscope 21 to 27 October 2024
Weekly Horoscope : या आठवड्यात ५ राशींचे भाग्य उजळणार, प्रगतीसह मिळणार बोनस! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
code of conduct, political billboards banners Mumbai,
मुंबई : आचारसंहिता लागू होताच राजकीय फलक उतरवण्यास सुरुवात, ४८ तासांत ७ हजार ३८९ बॅनर्स, फलक हटवले

३ मे : रमजान ईद असल्याने यादिवशी बॅंक बंद राहील.

८ मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

१४ मे : शनिवार साप्ताहिक सुट्टी

१५ मे : रविवार साप्ताहिक सुट्टी

१६ मे : बुद्ध पौर्णिमा असल्याने या दिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.

२२ मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

२८ मे : शनिवार साप्ताहिक सुट्टी

२९ मे : रविवार साप्ताहिक सुट्टी