बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात ९ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण नोहेंबर महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.
सुट्ट्यांची यादी
४ नोव्हेंबर- नरक चतुर्दशीमुळे बेंगळुरू वगळता सर्व शहरांतील बँका काम करणार नाहीत.
५ नोव्हेंबर – अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनउ, मुंबई आणि नागपूर येथे दिवाळी/विक्रम संवत/नववर्ष/गोवर्धन पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
१९ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमेनिमित्त भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर या बँका बंद असतील.
शनिवारीही बँका बंद
या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारीही बँकांमध्ये कामकाज होणार नाही. १३ नोव्हेंबर हा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार असून २७ नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
रविवारी बंद राहतील बँका
याशिवाय ७, १४, २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने देशातील सर्व शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत.