मार्च महिना सुरू होण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील बँकांची सुट्टीची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्यांसह महाशिवरात्री आणि होळीच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार मार्च २०२२ मध्ये बँका १३ दिवस बंद राहतील. आपल्या देशात प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि तिथले सणही वेगळे आहेत. यावेळी मार्च महिन्यात अनेक स्थानिक सण येत आहेत. मात्र, या कालावधीत ऑनलाइन सेवा सुरू राहतील.
मार्च २०२२ मध्ये पहिल्याच दिवशी महाशिवरात्री आहे आणि १७ आणि १८ मार्चला होळी आहे. या निमित्ताने सुट्टी असेल. यासोबतच अनेक राज्यांतील स्थानिक सणांच्या दिवशी बँकाही बंद राहतील. अशा परिस्थितीत तुम्ही नकळत बँकेत जात असाल तर बँक बंद असू शकते. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी एकदा सुट्ट्यांची यादी तपासून पाहा.
रिझर्व्ह बँकेनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या बँकांना सुट्ट्या
- १ मार्च रोजी महाशिवरात्रीमुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, केरळसह अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल. तर आगरतळा, आयझॉल, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा आणि शिलाँगमध्ये महाशिवरात्रीची सुट्टी नसेल.
- ३ मार्च रोजी लोसारमुळे गंगटोकमध्ये बँका बंद असतील.
- ४ मार्च रोजी चपचार कुटमुळे आयझॉलमधील बँका बंद असतील.
- ६ मार्च रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.
- १२ आणि १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद असतील.
- १७ मार्चला होलिका दहननिमित्त देहरादून, लखनौ, कानपूर आणि रांचीमध्ये बँका बंद असतील.
- १८ मार्च रोजी धुळीवंदन असल्याने देशातील बहुतांश शहरांमध्ये बँका बंद असतील.
- १९ मार्च रोजी होळी/याओसांगमुळे भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणामध्ये बँका बंद असतील.
- २० मार्चला रविवार असल्याने सुट्टी आहे.
- २२ मार्च रोजी बिहार दिवस असल्याने बिहारमध्ये बँक बंद असतील.
- २६ आणि २७ मार्च रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद असतील.