Bank Holidays in March 2023: तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये जर बॅंकेमध्ये जायचे असेल, तर त्याचं नियोजन आधीच नियोजन करावं लागेल. असे न केल्यास तुम्ही सुट्टीच्या दिवशी बॅंकेत जाल आणि तुमचा वेळ वाया जाईल. नुकतीच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मार्च २०२३ मधील सुट्ट्यांबाबतची माहिती प्रसारित केली आहे. मार्च महिन्यामध्ये एकूण १२ दिवस बॅंका बंद असणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सणउत्सव यांसह दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील शनिवार तसेच प्रत्येक आठवड्यातील रविवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतामधील मध्यवर्ती बॅंकाच्या सुट्ट्यांचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक या तत्त्वावर वर्गीकरण केले जाते. त्यातील राष्ट्रीय श्रेणीमध्ये मोडणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवशी देशभरातल्या बॅंका बंद असतात. तसेच प्रादेशिक सुट्ट्यांबाबतचे निर्णय त्या-त्या राज्यानुसार घेतले जातात. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन बॅंकींगचे प्रमाण वाढले असले तरी कधी-कधी बॅंकेमध्ये जावे लागू शकते. अशा वेळी Bank Holidays बद्दलची माहिती असणे फायदेशीर ठरु शकते.

मार्च २०२३ मधील सुट्ट्यांची यादी –

३ मार्च २०२३: चपचार कुट (आयझॉल, मिझोरम)

५ मार्च २०२३: रविवार

७ मार्च २०२३: धुळीवंदन

८ मार्च २०२३: आगरतळा, अहमदाबाद, आयझॉल, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून आणि गंगटोकसह काही शहरांमध्ये बँक हॉलिडे आहे.

९ मार्च २०२३: होळी (पटना)

११ मार्च २०२३: दुसरा शनिवार

१२ मार्च २०२३: रविवार

१९ मार्च २०२३: रविवार

२२ मार्च २०२३: गुढीपाडवा

२५ मार्च २०२३: चौथा शनिवार

२६ मार्च २०२३: रविवार

३० मार्च २०२३: श्रीराम नवमी

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank holidays in march 2023 how many days banks will be closed in next month check full list yps