सप्टेंबर महिना संपत आला असून या वर्षातला दहावा महिना म्हणजे ऑक्टोबर महिना सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बँकांशी संबंधित महत्वाची कामं तुमची बाकी असतील तर ती येत्या काही दिवसात पूर्ण करुन घ्या. कारण ऑक्टोबर महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या असतील. संपूर्ण महिन्यात एकूण दहा दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
ऑक्टोबर हा सणांनी भरलेला महिना
ऑक्टोबर २०२२ मध्ये सणांसोबतच बॅंक हॉलिडेजचीही भर पडेल. जर आपण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ऑक्टोबरच्या सुट्टीच्या कॅलेंडरवर नजर टाकली तर या महिन्यात गांधी जयंती, दुर्गा पूजा, दसरा, दिवाळी, ईद यासह अनेक प्रसंगी बँका बंद असतील. अशा परिस्थितीत, पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कामाचा निपटारा करण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही बँक कधी बंद राहणार आहेत, याची यादी एकदा तपासून घ्या.
(आणखी वाचा : Navratri 2022 9 Colors: घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत यंदाचे नवरात्रीचे ९ रंग व ९ देवींचे मंत्र पाहून घ्या )
ऑक्टोबरमधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
- २ ऑक्टोबर – गांधी जयंती, सुट्टी (रविवार)
- ५ ऑक्टोबर दसरा – सुट्टी (बुधवार)
- ८ ऑक्टोबर – बँक सुट्टी (दुसरा शनिवार)
- ९ ऑक्टोबर – बँक हॉलिडे (ईद-ए-मिलाद) रविवार सुट्टी
- १६ ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- २२ ऑक्टोबर – बँक सुट्टी (चौथा शनिवार सुट्टी)
- २३ ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- २४ ऑक्टोबर – दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी, लक्ष्मीपूजन (दिवस सोमवार)
- २५ ऑक्टोबर – दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी
- ३० ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील
राज्य आणि शहरांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगळ्या असतात. वास्तविक, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. सणासुदीच्या काळात बँकांच्या शाखा बंद असल्या तरी या काळात तुम्ही तुमचे बँकिंग संबंधित काम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकता. ऑनलाइन बँकिंग सेवा सर्व दिवस उपलब्ध असेल.
भारतीय रिझर्व्ह बँक लोकांच्या सोयीसाठी दर महिन्याला बँक हॉलिडे लिस्टची यादी जारी करते. मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ही यादी तपासू शकता.