सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी व्याजदरात ०.१० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे गृहनिर्माण, वाहन कर्ज आणि इतर कर्जे स्वस्त होतील. बँकेने रेपो संबंधीत व्याज दर (RLLR) ६.९० टक्क्यांवरून ६.८० टक्के केला आहे. याशिवाय, सीमांत खर्च आधारित व्याज दर (एमसीएलआर) देखील ०.१० टक्क्यांनी कमी केला आहे,” असं बँकेने एक निवेदन जारी करून सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कपातीनंतर MCLR आधारित व्याज दर एका दिवसासाठी ६.७० टक्के, एका महिन्यासाठी ६.८० टक्के, तीन महिन्यांसाठी ७.१० टक्के आणि सहा महिन्यांसाठी ७.१५ टक्के असेल. तर, एका वर्षासाठी MCLR ०.०५ टक्क्यांनी कमी करून ७.२५ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी, बँक ऑफ महाराष्ट्रने सणांच्या दरम्यान घर, कार आणि सोन्यावरील कर्जासाठी प्रक्रिया शुल्कापासून सूट देण्याची घोषणा केली होती. रेपो दर आधारित व्याजदरात कपात केल्यामुळे, गृहकर्जावरील व्याज ६.८ टक्के, कार कर्जासाठी ७.०५ टक्के आणि सोन्याच्या कर्जावरील व्याज ७.० टक्के झाले आहे.

तर, दुसरीकडे एयू स्मॉल फायनान्स बँकेने देशभरातील आपल्या ग्राहकांसाठी आगामी काळातील सण-उत्सवानिमित्त विशेष योजना जाहीर केल्या आहेत. या योजना ७ नोव्हेंबरपर्यंत चालतील. एका निवेदनानुसार, या महिनाभराच्या योजनांअंतर्गत, मर्यादित मुदतीच्या कर्जाच्या योजनांवर १०० टक्के सूट दिली जाणार आहे. जसे की सुवर्ण कर्जासाठी प्रक्रिया शुल्कावर १०० टक्के सूट, कृषी कर्जासाठी प्रक्रिया शुल्कामध्ये ०.२० टक्के सूट, व्यवसाय कर्जावरील प्रक्रिया शुल्कावर ०.५० टक्के सूट आणि वाहन खरेदीसाठी वाहन कर्ज प्रक्रिया शुल्कावर ५० टक्के सूट देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of maharashtra reduced interest rate for festive season know about home and vehicle loan rates hrc