नाकात नथ, सुंदर साडी, त्याला साजेसा मेकअप आणि केशरचना असं सगळं आवरून, नटून-थटून तुम्ही फोटो काढायला उभे राहिल्यानंतर फोटो चांगले आलेच नाहीत, तर किती वाईट वाटतं, हे काही वेगळं सांगायला नको. कधी फोटो छान येत नाहीत, तर कधी तुमची पोज चुकते. अशा वेळी काय करावं हेदेखील सुचेनासं होतं. तुमच्यासोबतही कधी असं झालं असेल तर या वर्षी या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या दिवाळीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी कोणत्या पोज देऊन, तुम्ही फोटो काढू शकता याबद्दल टिप्स देणारा एक व्हिडीओ @davoguecurly या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. दिवाळीसाठी असे सुंदर फोटो काढण्यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या पाहा.

दिवाळीत फोटो काढण्याच्या सहा पद्धती

१. सजावट करताना…

या पोजमध्ये तुम्ही संध्याकाळी फोटो काढू शकता. हा फोटो तुम्ही घर पणत्यांनी सजवत आहात, असे दाखवून काढू शकता. त्यासाठी एक ताटली फुलांनी किंवा फुलांच्या पाकळ्यांनी सजवून, त्यामध्ये काही पणत्या ठेवा. हातामध्ये एक पणती घेऊन, ती खाली ठेवताना एक छानसा फोटो काढू शकता.

[photo credit – @davoguecurly]

२. पणती पोज

दिवाळीमध्ये हातात पणती घेतलेला फोटो हमखास काढला जातो. पण, नेहमीसारखं दोन्ही हातांच्या ओंजळीत पणती चेहऱ्यासमोर धरून फोटो काढण्यापेक्षा या वर्षी हा फोटो थोड्या वेगळ्या पद्धतीने काढू शकता. त्यासाठी दोन्ही हातांत एक-एक पणती घेऊन, एक हात समोर ठेवा आणि दुसरा हात त्यालाच समांतर; पण थोड्या वरच्या दिशेला ठेवा. फोटो काढताना तुम्ही वरच्या पणतीच्या दिशेला बघू शकता.

[photo credit – @davoguecurly]

३. फुलांसोबतचा फोटो

आता या पोजमध्ये कॅमेरा हा खालच्या दिशेने तुमच्याकडे ठेवा. वरून तुम्ही साडीचा पदर एका हातावर घेऊन, हातात फुलांची परडी धरा. आता फोटो काढताना, फुलांच्या परडीतील फुलं कॅमेऱ्याच्या दिशेनं ओता.

[photo credit – @davoguecurly]

४. उटणं लावतानाची पोज

हा फोटो तुम्ही पाडव्याच्या दिवशी काढू शकता. तेल, उटणं लावतानाची ही अत्यंत सुंदर पोज आहे. त्यामध्ये तुम्ही आपला एक हात थोडा लांब करा. दुसऱ्या हातानं त्याला नाजूकपणे उटणं लावा. उटणं लावत असताना चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून, उटणं लावणाऱ्या हाताकडे बघा. मागची भिंत आणि दिव्यांना डी-फोकस करून, तुमचा चेहरा फोकसमध्ये ठेवून फोटो काढा.

[photo credit – @davoguecurly]

५. फुलांची उधळण

या फोटोमध्ये तुमच्यावर कुणीतरी फुलं उधळत आहे, अशी पोज द्या. या फोटोसाठी जमिनीवर बसा आणि सर्व केस एका बाजूला घ्या. आता उधळल्या जाणाऱ्या फुलांना तुमचे दोन्ही हात रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं वाटेल अशा रीतीनं ठेवा. झेंडूच्या पाकळ्या उधळून, सुंदर फोटो काढा.

[photo credit – @davoguecurly]

६. पणती पोज-२

शेवटी कितीही नव्या पद्धतीनं फोटो काढले तरीही दोन्ही हातांच्या ओंजळीत पणती घेऊन फोटो काढल्याशिवाय आपलं मन काही भरत नाही. असं वाटत असेल, तर ही आपली नेहमीची साधी-सोपी पोज कशी घ्यायची ते बघा. हा फोटो तुम्ही स्वतःदेखील काढू शकता. त्यासाठी एक पणती आपल्या ओंजळीत घ्या. पणतीची ज्योत कॅमेऱ्याच्या दिशेनं असावी. आता आपली मान थोडी तिरकी करून हलकीशी खाली करा आणि पणतीच्या ज्योतीकडे बघा. कॅमेऱ्याचा पूर्ण फोकस तुमच्या चेहऱ्यावर ठेवून, मागील सर्व गोष्टी डी-फोकस होऊ द्या. कॅमेऱ्यामधून चेहऱ्यावरील प्रकाश थोडासा कमी करा आणि फोटो काढा.

[photo credit – @davoguecurly]

इन्स्टाग्राम या सोशल मिडियाद्वारे @davoguecurly या हँडलने खास दिवाळीत फोटो काढण्यासाठी कशा पद्धतीच्या पोज द्यावा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

तुम्ही अशा सोप्या पोज देऊन दिवाळीदरम्यान सुंदर फोटो काढू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basic but interesting photo poses for diwali 2023 photoshoot at home try this tips and tricks dha