अनेकांना आपले केस लांब आणि काळे असावेत अशी इच्छा असते. परंतु टाळूवर उवांच्या उपस्थितीमुळे, लोकांचे केस अनेकदा निर्जीव आणि निरुपयोगी दिसतात. त्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करून पाहतात. काहीजण मेडिकलमधील औषधांचा देखील वापर करतात. मात्र , काही घरघुती उपाय देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे उवांच्या समस्येवर मात करता येऊ शकते. तुळस प्रत्येकांच्या घरी असते. तुळस देखील तुमच्या उवांच्या समस्येवर उपयोगी ठरू शकते. काही उपायांनी तुळशीचा अवलंब केल्याने तुम्हाला उवांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. जाणून घ्या त्या पद्धतींबद्दल…

उवांसाठी तुळस वापरणे

१) उवा काढण्यासाठी खोबरेल तेलात बदामाचे तेल मिसळा आणि त्यात तुळशीचे पाने मिसळा, आता तयार मिश्रण डोक्याला १० ते १५ मिनिटे लावा. असे केल्याने उवांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

२) नारळाचे तेल गरम करून त्यात तुळशीची पाने घाला. त्यानंतर हे तेल उकळू द्या. थंड झाल्यावर बनवलेले तेल प्रभावित भागावर लावा. असे केल्याने उवांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

३) तुळशीच्या पानांची पेस्ट डोक्यावर १५ ते २० मिनिटे लावा. असे केल्याने उवांपासून मुक्ती मिळते.

४) जर तुम्हाला उवांचा त्रास होत असेल तर तुळशीच्या पाण्याने डोके धुवा. असे केल्याने उवांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

५) तुम्हाला हवे असल्यास तुळशीच्या पेस्टमध्ये सफरचंद व्हिनेगर मिसळा आणि तुमच्या टाळूला लावा. असे केल्याने उवांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.