How to Bath Properly: प्रत्येकाने दररोज आंघोळ केली पाहिजे. याने आपले फक्त शरीर स्वच्छ होत नाही तर आरोग्याला पण अनेक फायदे मिळतात. आंघोळीचे फायदे सर्वांनाच माहित आहेत, परंतु जर तुम्ही चुकीची आंघोळ करत असाल तर ते तुम्हाला फायद्याऐवजी नुकसानकारक ठरू शकते. खरं तर, आंघोळीच्या वेळी शरीर स्वच्छ करण्यासाठी आपण अनेकदा अशा गोष्टींचा वापर करतो, ज्यामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचते आणि आपल्याला त्याबद्दल माहितीही नसते. जोपर्यंत आपल्याला याबद्दल कळेल तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे याची वेळीच दखल घेणं गरजेचं आहे. आंघोळीशी संबंधित कोणत्या चुका लगेच बदलल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
आंघोळ करताना ‘हे’ भाग चोळू नका
डॉक्टरांच्या मते, कोपर, गुडघे, मांड्या, मान यासह शरीराचे काही भाग अनेकदा थोडेसे काळे किंवा गडद असतात. त्यामुळे अंघोळीच्या वेळी लोक त्याभागावर घासून घासून आंघोळ करतात आणि तो काळसरपणा दूर करतात. असे केल्याने त्वचेचे थेट नुकसान होते. चोळण्याने आणि स्क्रबिंग केल्याने त्वचेचा वरचा थर हळूहळू खराब होतो आणि त्यात सनबर्न, टॅनिंग किंवा रॅशेस यांसारखे लाल ठिपके तयार होऊ लागतात.
( हे ही वाचा: तुम्हीही हातांची बोटे सतत मोडताय? तर या सवयीमुळे वाढू शकतो अनेक रोगांचा धोका, वेळीच जाणून घ्या)
त्वचेचा कर्करोग ‘हा’ आजार असण्याची शक्यता वाढते
वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्क्रबिंग केल्याने अमायलोइड नावाचे प्रोटीन रंगद्रव्य त्वचेतून बाहेर पडू लागते. त्यामुळे शरीरावर हायपरपिग्मेंटेशन सुरू होते. त्यामुळे पुढे जाऊन त्वचेचा कर्करोग किंवा इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे आंघोळ करतेवेळी त्वचेला जास्त घासण्याचा प्रयत्न करू नका.
‘या’ उपायांनी त्वचा स्वच्छ करा
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला कोपर आणि गुडघे काळे पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आंघोळ करताना त्या भागांना घासण्याऐवजी इतर पद्धतींचा अवलंब करा, ज्यामुळे त्या भागांना इजा न होता ते सहज स्वच्छ करता येऊ शकतात. यासाठी व्हिटॅमिन-ए आणि ई असलेल्या अन्नाचा आहारात समावेश करावा. तुमचे गुडघे आणि कोपर चांगले ओलसर ठेवा. तेथे घर्षण कमी करण्यासाठी गुडघे आणि कोपरांवर जास्त दबाव टाकणे टाळा.