सध्या पावसाळा जोमात सुरू आहे. पावसात भिजण्याची मजाच वेगळी असते. भरपूर जणांना पावसात भिजायला आवडत. मात्र, काहीजण आजारी पडण्याच्या भीतीने पावसात भिजणे सहसा टाळतात. परंतू, पावसात भिजण्याने आरोग्याला फायदे मिळू शकतात, याबद्दल तुम्ही ऐकलंय का? होय, पावसात आंघोळ करणे आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. पावसात भिजल्याने असे अनेक चमत्कारिक फायदे आपल्या शरीराला मिळतात, ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. तर जाणून घ्या पावसात भिजण्याचे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात. तसंच पावसात अंघोळ केल्यानंतर आपण कोणती काळजी घ्यावी. ज्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.

पावसात भिजण्याचे फायदे

१) व्हिटॅमिन बी १२ मिळवा

अहवालानुसार, पावसाचे पाणी खूप हलके आहे. त्याच्या पीएच लेव्हलमध्ये अल्कधर्मी देखील आहे. जे तुमचे मन त्वरित ताजेतवाने करते. पावसाच्या पाण्यात सूक्ष्मजीव असतात जे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ तयार करण्यास मदत करतात. फक्त १० ते १५ मिनिटे पावसात आंघोळ केल्याने तुम्हाला शरीरास आवश्यक असणारे व्हिटॅमिन बी १२ मिळते.

( हे ही वाचा: व्हायरल ताप असल्यास लगेच औषधे खाऊ नका; जाणून घ्या लवकर बरं होण्यासाठी सर्वात सोपा उपाय)

२) हार्मोनल संतुलन

आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यासाठी पावसात आंघोळ करणे हा एक चांगला मार्ग आहे. याने नक्की फायदा होतो. यासोबतच तुमच्या कानाची समस्याही पावसात आंघोळ केल्याने दूर होऊ शकते. पावसाचे पाणी कानाच्या संसर्गावर उपचार करते आणि तुमच्या कानदुखीपासून आराम देते. यासाठी पावसात १० मिनिटे भिजणे फायदेशीर आहे.

३) तणाव दूर होतो

पावसात आंघोळ केल्याने शरीरातून एंडॉर्फिन आणि सेरोटोनिनसारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. ते तुमची चिंता आणि तणाव दूर करून तुमचा मूड आनंदी करण्याचे काम करतात. अशा वेळी मोसमी पावसात आंघोळ करावी. तुम्ही जर १० ते १५ मिनिटात पावसात आंघोळ केली, तर तुमचा तणाव दूर करून तुम्ही आनंदी राहू शकता.

( हे ही वाचा: पावसाळ्यात ‘या’ हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम)

४) केसांसाठी फायदेशीर

पावसाच्या पाण्यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अल्कलाइन तुमच्या केसांच्या मुळांपासून घाण आणि चिकटपणा साफ करू शकते. पावसात रोज आंघोळ केल्याने केस चांगले दिसतात. तसंच केसांसंबंधित असलेल्या समस्याही पावसात भिजल्याने दूर होऊ शकतात.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

  • पावसात जास्त वेळ घालवल्याने तुम्ही आजारी पडू शकता, त्यामुळे पावसात थोडी अंघोळ करा.
  • पावसात भिजल्यावर पुन्हा एकदा कोमट पाण्याने आंघोळ करा. याने तुम्ही आजारी पडणार नाहीत.
  • पावसात आंघोळ केल्यावर सौम्य शाम्पूने केस धुवा. कडुनिंब शॅम्पू देखील चांगला सिद्ध होऊ शकतो.

Story img Loader