ऋतूनुसार बहुतेक लोक गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ करतात, पण तुम्हाला माहित आहे का की पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने अनेक समस्या दूर होतात. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो तसेच तणावही कमी होतो. याशिवाय मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आणखी कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
- सांधेदुखी होईल कमी
मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास सांधेदुखीही कमी होते. आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकले तर हाडांमधील किरकोळ दुखणे दूर होते. याशिवाय जर तुमच्या पायात खूप दुखत असेल तर कोमट मिठाच्या पाण्याने पाय धुतल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे
- संसर्गही कमी होईल
कोणत्याही प्रकारचे संसर्ग दूर करण्यासाठी मिठाचे पाणी खूप उपयुक्त आहे. वास्तविक, मिठात असलेले खनिजे अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करतात. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील सर्व छिद्रे उघडतात आणि शरीरातील संसर्गाचा धोका कमी होतो.
- पुरळ होणार नाहीत
मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठीही मिठाचे पाणी खूप फायदेशीर आहे. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने छिद्र उघडतात, त्यानंतर शरीरातील घाण सहज बाहेर पडते. अशाप्रकारे, बॉडी डिटॉक्स झाल्यामुळे, चेहऱ्यावरील डाग आणि पुरळ देखील कमी होतात. तसेच हे पाणी त्वचेला हायड्रेट करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Skin Care Tips : वयाच्या तिशीनंतरही तरुण दिसण्यासाठी आजपासूनच फॉलो करा ‘या’ टिप्स
- ताण कमी होतो
जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा खूप ताण येत असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ जरूर करावी. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मिठाच्या पाण्यात असलेली खनिजे शरीरात शोषली जातात. सोडियमचा मेंदूवरही परिणाम होतो, असे मानले जाते. याशिवाय बॉडी डिटॉक्स झाल्यावर शरीरातील ताणही निघून जातो, ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो आणि तुम्हाला बरे वाटते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)