Easy Technique For Cleaning Bathroom Bucket Or Mug Cleaning At Home : घर साफ करताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाथरूम साफ करणे. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, बाथरूमच्या टाइल्सवर पिवळे डाग दिसतात, जे साफ करणे खूप कठीण असते आणि पाहुणे घरात आले की मग तारांबळ उडते. कारण घराच्या स्वच्छतेबरोबर बाथरूम स्वच्छ ठेवणेही (Bathroom Mug Or Bucket Cleaning) गरजेचे आहे. अस्वच्छ बाथरूम तुमच्या घराची शोभा तर कमी करतेच, पण त्यात जंतूसुद्धा वेगाने वाढतात, ज्यामुळे तुम्ही आजारीदेखील पडू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही जण बाथरूमची फरशी, टाईल्स, भांडे आणि सिंक साफ करतात, पण बाथरूममध्ये ठेवलेल्या गोष्टी साफ करायला विसरतात. विशेषत: बाथरुममध्ये वापरलेली बादली, मग, स्टूल, पाट (Bathroom Mug Or Bucket Cleaning) अतिशय घाण असतात. बादली आणि मगवर पिवळ्या खुणा, पिवळे डाग दिसतात. हळूहळू बादली आणि मगचा रंगसुद्धा पिवळा होऊ लागतो. अशा परिस्थितीत घाणेरडी बादली आणि मग वापरणे फार कठीण होऊन बसते.पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.

आम्ही बाथरूमची बादली आणि मग साफ करण्याच्या काही सोप्या टिप्स (Bathroom Mug Or Bucket Cleaning) तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, यामुळे बादली आणि मगचे सर्व डाग निघून जातील…

बाथरुम क्लीनर : बाथरूम साफ करताना संपूर्ण बाथरुममध्ये क्लीनर लावून थोडा वेळ तसेच ठेवून द्या. त्याचप्रमाणे बाथरूममध्ये ठेवलेली बादली, मग आणि स्टूलवर ‘बाथरुम क्लीनर’ लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या. आता त्यांना स्क्रबरच्या मदतीने घासून स्वच्छ करा. बादली आणि मग आठवड्यातून एकदा अशा प्रकारे स्वच्छ केल्याने ते नव्यासारखे चमकतील आणि पिवळे डाग सहज निघून जातील.

सोडा आणि लिंबू : बाथरुममध्ये ठेवलेल्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सोडा आणि लिंबूसुद्धा वापरू शकता. याच्या मदतीने डाग सहज काढता येतात. सोडा आणि लिंबूचे जाडसर मिश्रण तयार करा आणि ते बादली, मग आणि स्टूलवर लावा. काही वेळ असेच राहू द्या. यानंतर बादली आणि मग स्क्रबरने घासून स्वच्छ करा. याच्या मदतीने घाणेरडी बादली आणि मग सहज स्वच्छ होतील आणि नव्यासारखे चमकू लागतील.

ॲसिड : काही लोक बाथरुम स्वच्छ करण्यासाठी ॲसिडचा वापर करतात. पण, बाथरुमच्या स्वच्छतेसाठी सौम्य ॲसिडचा वापर करावा, कारण ॲसिडमुळे खुणा पडतात. ॲसिडमध्ये थोडे पाणी मिसळा, ते डागांवर लावा आणि ते पसरवा. बाथरुममध्ये ठेवलेल्या मग, बादल्या किंवा इतर गोष्टींवर ॲसिड लावा आणि तसेच राहू द्या. काही वेळानंतर, हातांवर हातमोजे घाला आणि ब्रशच्या मदतीने ते स्वच्छ करा, यामुळे तुमचे अस्वच्छ बाथरूम चमकण्यास सुरुवात करेल. लक्षात ठेवा की ॲसिड त्वचेला स्पर्श होणार नाही यासाठी काळजी घ्या.