Bavdhan Bagad Yatra 2024: ‘ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती…’ हे ऐकल्यावर आपसूकच तुम्हाला ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाची आठवण झाली असेल. हे गाणं ऐकताच प्रत्येकाला आपल्या गावची आठवण येते. आता अंग बाई अरेच्चा चित्रपटाची आठवण झालीच आहे तर मग चला यामध्ये दाखवलेली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ यावर्षी कधी आहे? ही यात्रा खरी कशी साजरी होते? बगाड म्हणजे नेमकं काय? बगाडी कसा ठरवला जातो? आणि काय आहे साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध अशी बावधन यात्रा ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात यंदा ३० तारखेला होणार आहे. साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये भरते. बावधन गावची बगाड यात्रा ही दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरवली जाते. मात्र, याची तयारी ही जवळ जवळ एक ते दीड महिना अगोदरपासून केली जाते. यावेळी बावधन बगाड यात्रा समिती अध्यक्ष – रामचंद्र पिसाळ, सदस्य – चंद्रकांत भोसले, विजयकुमार रासकर, सचिव-दिलीप कदम, दादासो ठोंबरे अशी पाच जणांची समिती आणि ग्रामस्थ एकत्र येत सगळं नियोजन करतात.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Singh : केंब्रिजमध्ये शिक्षण, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान! अशी होती मनमोहन सिंग यांची कारकीर्द
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
raigad beaches crowded with tourists
रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस
बावधन बगाड यात्राउत्सव

बगाड म्हणजे नेमकं काय?

बगाड म्हणजे नक्की काय?, थोडक्यात सांगायचं झालं तर बगाड म्हणजे बैलांनी ओढला जाणार गाडा. दगडी चाके असलेला रथ. बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल दोन ते तीन टन इतके असते. बगाडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, मग येतो खांबावर शीड अशी एकंदरीत बगाडाची रचना असते. बगाडाच्या शिडाला म्हणजेच रथाच्या टोकाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनच्या बगाड यात्रेचा कौल काढला जातो आणि वर्षानुवर्षे काशीनाथाला केलेल्या नवसांमधील कुणा एकाचा यात कौल लागतो आणि बगाड्या निवडला जातो. ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे, अशाच व्यक्तीला बगाड्या म्हणून निवडले जाते. यात जर एखाद्या महिलेने ‘मला मूल होऊ दे मग मी बगाडं घेईन’, असा जर नवस केला असेल तर त्यांना त्या लहान मुलासहित बगाडं घेऊन नवस फेडावा लागतो. चार दिवस चालणार्‍या या यात्रेत पहिला दिवस देवाचे लग्न, दुसरा दिवस मांसाहारी जेवणाचा, तिसरा दिवस हा ‘छबिना’ (पारंपरिक खेळ) आणि शेवटचा दिवस बगाडाचा असतो. या पालखीवर गुलाबी रंगाचा गुलाल खोबरे टाकल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही. दिवसभर बगाडाच्या शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या उपवास केल्यानंतर त्याच दिवशी रात्री ताक पिऊन उपवास सोडतो.

बगाड

बगाड कसे बनवले जाते?

बगाड यात्रेची सुरुवात होते ते बगाड तयार करावयला लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यापासून. बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल दोन ते तीन टन इतके असते. पूर्ण बगाड बांधणीत एकही धातूची गोष्ट वापरली जात नाही, अगदी साधा खिळासुद्धा नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षीच हे साहित्य बनवलं जात नाही, तर यात्रा संपन्न झाल्यानंतर हे साहित्य एका विहिरीत ठेवले जाते. बगाड खिल्लार बैलांच्या साह्याने ओढले जाते. बगाडाचा मार्ग ७५% शेतामधून, तर २५% डांबरी रोडवरून होतो. हे बैल साधे नसून खिल्लार बैलांच्या साहाय्याने बगाड ओढण्याची परंपरा आहे. बगाड ज्या शेतामधून ओढत नेले जाते, तिथे पीक खूप जोमात येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे बगाड आपल्या शेतातून जावं यासाठी प्रत्येक शेतकरी उत्सुक असतो. बावधन गावामध्ये पिसाळ घराणे आणि भोसले घराणे ही खूप ऐतिहासिक जुनी घराणी आहेत. यांना गावात पिसाळ तरफ आणि एक भोसले तरफ बगाडाला दिशा दाखवण्याचं काम करतात. बगाड नेमकं कुठून न्यायचं या सूचना ते देत असतात. बगाडाच्या डाव्या बाजूला १० माणसे आणि उजव्या बाजूला १० माणसे असतात. यातील उजव्या बाजूचा मान पिसाळ तरफ आणि डाव्या बाजूचा मान भोसले तरफ यांना दिलेला असतो.

असं बनवलं जातं बगाड

बगाडी कसा ठरवला जातो?

साताऱ्यातील बावधन गावातील यात्रा म्हणजेच सुप्रसिद्ध बावधनची यात्रा बऱ्याच वर्षांपासून कुतूहलाचा विषय ठरत आहे. मात्र, या यात्रेदरम्यान सर्वात मुख्य आकर्षणाचा विषय असतो ते म्हणजे ‘बगाडी’.. या यात्रेदरम्यान दरवर्षी एका व्यक्तीला हा बगाडी होण्याचा मान मिळतो. मात्र, बऱ्याच जणांना असा प्रश्न अजूनही आहे की, हा बगाडी नेमका कसा निवडला जातो? यासाठी काय करावं लागतं? फक्त गावातील व्यक्तीलाच हा मान मिळतो का? यासंदर्भात बावधान बगाड गावचे समिती अध्यक्ष रामचंद्र पिसाळ यांनी माहिती दिली आहे.

खिल्लार बैल

हेही वाचा >> Travel trend: स्वस्त पर्यटनाच्या मोहजालात महागडी फसवणूक!

कौल लावून ठरतो बगाड्या

बावधनचा हा बगाडी होळी पौर्णिमेला रात्री १२ वाजता ठरवला जातो. ग्रामस्थ आणि बावधन बगाड यात्रा समिती एकत्र येऊन कौल काढतात आणि बगाड्याचं नाव घोषित करतात. यंदा होळी पौर्णिमेला म्हणजेच २५ तारखेला हा कौल काढला जाईल. यावेळी डाव्या बाजूला पाच कौल आणि उजव्या बाजूला पाच कौल असतात. म्हणजेच उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला गहू असतात. प्रत्येक नवसपूर्ती व्यक्तींच्या नावाने गहू गाभाऱ्यामध्ये लावले जातात. उजव्या बाजूचा जो गहू पडेल तो बगड्या म्हणून निवडला जातो. म्हणजे उजवा कौल ज्याच्या नावाने लागेल त्याच्यावर बगाड येते. यानंतर सर्वांच्या संमतीनं पंच बगाड्याचं नाव घोषित करतात.

ज्याच्यावर बगाड येईल तो बगाड्या व गावकरी, मित्रपरिवार काळभैरवनाथ मंदिराला पाच फेऱ्या मारतो आणि ‘काशीनाथाचे चांगभले’च्या गजरामध्ये संपूर्ण गाव भक्तीमय होऊन जातो. यानंतर होळीच्या रात्रीपासून ते बगाड होईपर्यंत बगाड्या मंदिरातच असतो. हे पाच दिवस पहाटे ४ वाजता गावातील सर्व जण मंदिरात जाऊन सर्व देवांना पाणी घातलं जातं आणि शेवटच्या दिवशी बगाड्याला त्याचा नवस फेडण्याचा मान दिला जातो.

Story img Loader