शरीरातील होणाऱ्या बदलाविषयी आपण कायम जागृत राहिले पाहिजे. लघवीचा रंग बदलला तर हे सुद्धा आजाराचं लक्षण आहे. या लघवीच्या रंगातून आपल्याला आजार कळतो. तज्ज्ञांच्या मते, लघवीचा रंग साधारण पिवळा असावा. तसेच लघवीचा रंग पूर्णपणे स्पष्ट असणे हे देखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण हे अनेक रोग सूचित करते. अशा परिस्थितीत असे का होते सविस्तर जाणून घेऊया.

कधीकधी काही आजारांमुळे लघवीचा रंग बदलू शकतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीर हायड्रेटेड असते तेव्हा लघवीचा रंग पारदर्शक आणि हलका पिवळा असतो. परंतु जर तुमच्या लघवीचा रंग अगदी स्पष्ट असेल तर याचा अर्थ तुम्ही भरपूर पाणी वापरत आहात आणि तुम्ही त्याचे सेवन थोडे कमी करणे महत्त्वाचे आहे.

Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स

(हे ही वाचा : तुम्हाला ‘ग्रीन टी’ पिण्याची सवय आहे का? मग आजच ग्रीन टीमध्ये ‘या’ दोन गोष्टींचा समावेश करा; जाणून घ्या फायदे)

तुम्ही सकाळी उठल्याबरोबर लघवी करता तेव्हा त्याचा रंग खूप पिवळा दिसतो. याचा अर्थ शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकले गेले आहेत. पण जर तुमची सकाळची पहिली लघवी अगदी स्पष्ट दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी घेत आहात. याचा तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट स्तरावर खूप नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता. याचे निराकरण करण्यासाठी, आपण पाण्याचे सेवन थोडे कमी करणे आवश्यक आहे.

याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुम्ही भरपूर पाणी प्यायले नाही तरीही तुमच्या लघवीचा रंग स्पष्ट दिसू शकतो. मधुमेह इन्सिपिडस हा एक असामान्य विकार आहे ज्यामुळे शरीरातील द्रवपदार्थाची पातळी अनियंत्रित होते. यामध्ये व्यक्तीला खूप तहान लागते आणि वारंवार लघवी येते. डायबिटीज इन्सिपिडसचे एक लक्षण म्हणजे लघवीचा रंग स्पष्ट होणे. मूत्रवर्धक औषधांमुळे देखील वारंवार लघवीच्या समस्येचा सामना करावा लागतो. तसेच यामुळे लघवीचा रंग स्पष्ट दिसतो. अल्कोहोलच्या सेवनाने लघवी जास्त होते आणि लघवी वारंवार सोडल्यामुळे लघवीचा रंग स्पष्ट होतो.

(हे ही वाचा : तुम्हाला सतत तहान लागते का? हे असु शकते गंभीर आजाराचे लक्षण; लगेच जाणून घ्या )

लघवीचा रंग काय सांगतो?

फिकट पिवळा – जर तुमची लघवी फिकट पिवळ्या रंगाची असेल तर याचा अर्थ तुम्ही चांगले हायड्रेटेड आहात.

गडद पिवळा – जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर याचा अर्थ तुम्हाला डिहायड्रेशनचा जास्त धोका आहे आणि तुम्ही जास्त प्रमाणात पाणी प्यावे.

गुलाबी आणि लाल -ब्लूबेरी, बीटरूट इत्यादी काही गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी दिसू शकतो. परंतु जर तुमच्या लघवीमध्ये गुलाबी आणि लाल दिसण्यासोबत रक्त येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

निळा आणि हिरवा – लघवीचा निळा आणि हिरवा रंग एखाद्या विशिष्ट औषधामुळे असू शकतो. लघवीमध्ये फेस येणं ही गंभीर समस्या नसली तरी ती सतत होत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)