Hot Water Bath: थंडीच्या दिवसात अनेक लोक गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. कारण, अनेकजण थंडी वाढल्यावर असा विचार करतात की, जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यांना आराम मिळेल. मात्र, नेमके याच्या उलटे होत असून यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होते. गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीराला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होते. तज्ज्ञांच्या मते, थंडीत जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले नाही. याचा आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होतो. वास्तविक गरम पाणी त्वचेच्या केराटिन नावाच्या पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे त्वचेला खाज, कोरडेपणा आणि पुरळ उठण्याची समस्या वाढते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ केल्यास आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरम पाण्याने आंघोळ केल्याने होणारे नुकसान

त्वचा कोरडी होऊ शकते

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायी वाटते. मात्र, यामुळे आपल्या शरीराला मोठा अपाय होऊ शकतो. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते कारण ती तुमच्या त्वचेतील ओलावा काढून टाकते. जर तुमच्याकडे संवेदनशील त्वचा असेल तर गरम पाण्यात अंघोळ करण्यापासून दूर राहणे चांगले आहे.

आणखी वाचा : Winter Tips: हिवाळ्यात अजिबात करू नका ‘या’ दहा चुका; जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान

गरम पाण्याने रक्तदाबाचा त्रास
जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर थंड वातावरणातून बाहेरून येऊन एकदम गरम पाण्याने आंघोळ करता कामा नये. कारण तुम्ही थंड वातावरणात असता तेव्हा तुमचा रक्तदाब कमी होतो आणि अचानक शरीरावर गरम पाणी पडल्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो. अशावेळी ब्रेनस्ट्रोक आणि ह्रदयविकाराचा झटका येण्याची भीतीदेखील असते.

गरम पाण्यामुळे त्वचेवर जलद सुरकुत्या येऊ शकतात

प्रत्येकाला तरुण दिसणाऱ्या त्वचेची इच्छा असते, परंतु नियमित गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू शकतात आणि तुमची त्वचा खूप लवकर खराब होऊ शकते.

गरम पाणी केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते

गरम पाणी केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते. तुमच्या डोक्यावर गरम पाणी ओतल्याने तुमच्या केसांच्या मुळांना नुकसान होऊ शकते परिणामी केस जास्त गळतात. गरम पाणी व्यसन बनू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be careful when bathing with hot water pdb
Show comments