प्रत्येक स्त्रीच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक असणे आवश्यक आहे. अशास्थितीत लिपस्टिक ही प्रत्येक स्त्रीची बेस्ट फ्रेंड असते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यास लिपस्टिकचा खूप मोठा वाटा असतो. बहुतेक सर्व महिला या दररोज ऑफिस किंवा बाहेर जाताना लिपस्टिक लावतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का ही दररोज लावली जाणारी लिपस्टिक तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. होय, तुम्ही जी लिपस्टिक लावतात त्यामुळे तुमच्या आरोग्याला खूप मोठे नुकसान होऊ शकते. ते कसे जाणून घेऊया. तसंच लिपस्टिक बाबतीत कोणती काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दलही जाणून घेऊया.

अशाप्रकारे लिपस्टिक तुमचे नुकसान करू शकते

ऍलर्जी होण्याची शक्यता

लिपस्टिकमध्ये विषारी घटक वापरले जातात. तुमचे शरीर हे विष शोषून घेण्याची दाट शक्यता असते. स्त्रिया कधीकधी हे घटक गिळतात. काहींना अचानक ओठांजवळ खाज सुटते. कारण लिपस्टिकमध्ये बिस्मथ ऑक्सिक्लोराईड नावाचे रसायन असते.

(हे ही वाचा: लॅपटॉपवर तासनतास काम केल्याने डोळे थकतात? ‘या’ घरगुती उपायांनी लगेच आराम मिळेल)

कर्करोगाचा धोका

लिपस्टिकमध्ये असलेले घटक कर्करोगजन्य असतात, त्यामुळे लिपस्टिकमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. लिपस्टिक जपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे खोकला, डोळे जळणे आणि इतर ऍलर्जी यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

किडनी निकामी होऊ शकते

रोज लिपस्टिक वापरल्याने किडनी निकामी होऊ शकते. हे लिपस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅडमियम असल्यामुळे होऊ शकते. पोटात गाठ ही देखील आणखी एक समस्या आहे जी या विषारी रसायनामुळे होऊ शकते.

( हे ही वाचा: परदेशात प्रवास करायचा आहे? भारतीय व्हिसाशिवाय या ६० देशांमध्ये तुम्ही जाऊ शकता, येथे यादी पहा)

लिपस्टिक खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी नेहमी घटकांकडे लक्ष द्या.
  • गडद लिपस्टिकमध्ये विषारी रसायने जास्त असतात. त्यामुळे लिपस्टिक लावण्यापूर्वी नेहमी पेट्रोलियम जेली लावा.
  • गरोदरपणात लिपस्टिक लावणे टाळा. त्यांचे सेवन केल्याने गर्भपात देखील होऊ शकतो.

Story img Loader