आपल्या चेहऱ्यावर कितीही सुंदर मेकअप केला, तरीही केवळ डोळ्यात घातलेल्या काजळाची सर कशालाच नसते, नाही का? नुसते काजळ लावले तरीही आपल्या डोळ्यांना एक वेगळीच चमक येते. डोळे अधिक पाणीदार आणि टपोरे दिसतात. बाजारामध्ये आपल्याला सध्या कितीतरी प्रकार आणि रंगांचे काजळ उपलब्ध आहेत. मात्र डोळ्यामध्ये घातल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या काजळाची बातच काही और आहे. मात्र आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये रासायनिक घटक असण्याची शक्यता असून त्याचा आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा वेळेस आपण घरी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून पारंपरिक पद्धतीने काजळ बनवू शकतो. काजळ हे सौंदरप्रसाधन अनेक वर्षांपासून वापरात आहे. त्यामुळे कोणत्याही रासयनिक घटकांचा वापर न करता आपण घरगुती काजळ कसे बनवू शकतो याच्या टिप्स ‘द टाइम्स ऑफ इंडियाच्या’ एका लेखामध्ये सांगितल्या आहेत. त्यानुसार घरच्याघरी काजळ बनवण्याची हॅक आपण पाहू.

हेही वाचा : Skin care : आला आला उन्हाळा; त्वचेला ‘टॅनिंगपासून’ कसे बरे सांभाळाल? पाहा हा घरगुती फेसपॅक

घरी काजळ कसे बनवावे पाहा.

साहित्य

तिळाचे तेल किंवा तूप – २ चमचे
बदाम – ४ ते ५ अथवा बदामाचे तेल – एक चमचा
एरंडेल तेल – १ चमचा
सिरॅमिक किंवा स्टीलची छोटी वाटी
सुती कापड/ कापूस
काड्यापेटी/ पणती किंवा मेणबत्ती

तुम्ही काजळ बनवण्यासाठी बदामाचा वापर करणार असल्यास, प्रथम बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेल्या बदामाची साले बाजूला करा आणि बदाम वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करा.

कृती

सिरॅमिक किंवा स्टीलच्या वाटीमध्ये तयार केलेली बदामाची पेस्ट अथवा बदामाचे तेल घालून घ्यावे.
त्याच वाटीत तिळाचे तेल किंवा तूप घालून सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या.
आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये एरंडेल तेल घालून पुन्हा सर्व गोष्टी मिसळून घ्या.
तयार मिश्रण मंद आचेवर गरम करून घ्यावे.
मिश्रण गरम करताना ते घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
या प्रक्रियेला साधारण १० ते १५ मिनिटे लागू शकतात.
मिश्रणाचा रंग बदलल्यानंतर आणि त्याला घट्टपणा आल्यानंतर वाटीतील काजळाचे मिश्रण थोडे थंड होण्यास बाजूला ठेवा.

हेही वाचा : Skin care : नाकावरचे ब्लॅकहेड्स चुटकीसरशी होतील गायब! घरगुती पदार्थांचा असा करा वापर; टिप्स पाहा

तयार काजळ जमा कसे करावे?

सुती कापड किंवा कापसाच्या बोळ्याने मिश्रणातील अतिरिक्त तेल टिपून घ्यावे.
आता काड्यापेटीतील एक काडी किंवा मेणबत्ती पेटवून घ्या.
मेणबत्तीच्या ज्योतीजवळ, अतिरिक्त तेल गोळा केलेले कापड/ बोळा धरून ठेवा.
आता कापड जळल्यानंतर त्यातून निघणारे कण एका बाऊलमध्ये गोळा करून घ्या.
ही प्रक्रिया तुम्हाला हवे तेवढे काजळ जमा होईपर्यंत करावी.
आवश्यक तेवढे काजळ जमा झाल्यानंतर ते एका हवाबंद डबीत भरून घ्या.
काजळ पूर्णतः थंड झाल्यानंतर डबीचे झाकण घट्ट बंद करून घ्या.
तयार आहे आपले पारंपरिक पद्धतीने बनवलेले घरगुती काजळ.

[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beauty hacks how to make kajal at home try this amazing and easy trick check out the simple steps dha
Show comments