आपल्या त्वचेची काळजी घेणं ही एक चांगली सवय आहे. मात्र स्किन केअर रुटीनमध्ये बहुतांश महिला काही अशा चुका करतात, ज्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते व चेहऱ्यावरील चमक हळूहळू कमी होत जाते. नोकरी करणाऱ्या महिलांना रोज रोज स्किन केअर रुटीन करणं शक्य होत नाही. मात्र नोकरदार महिलांनो आता काळजी करु नका, कारण सुट्टीच्या दिवशी करण्यासारखं अगदी सोप्पं असं स्कीन केअर रुटीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या उपायाने तुमची त्वचा आठवडाभर चमकत राहील.

चमकदार त्वचेसाठी काय करावे?

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करणे खूप म्हत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकाराला साजेसे हलके क्लिन्जर वापरा. यानंतर, हलक्या फेस स्क्रबने तुमच्या चेहऱ्याला वर्तुळाकार गतीने मसाज करा, त्यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवा.

फेस मास्क – हे स्किनकेअर रूटीन फेस मास्कशिवाय अपूर्ण आहे. हे केवळ त्वचेला पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत करत नाही तर त्वचेला आराम देण्यासही मदत करते. तुमच्या त्वचेसाठी योग्य असा फेस मास्क निवडा. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग मास्क, तेलकट आणि पुरळ येणाऱ्या त्वचेसाठी क्ले मास्क किंवा चमकदार त्वचेसाठी उजळ मास्क. डोळ्यांना अतिरिक्त आराम देण्यासाठी आय पॅचेस देखील वापरता येतात.

मॉइश्चरायझेशन – त्वचा स्वच्छ झाली की तिला पुन्हा हायड्रेशनची गरज असते. अशा परिस्थितीत, हायड्रेटिंग टोनर लावा जेणेकरून त्वचा मॉइश्चरायझ होईल. हे टोनर तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हळूवारपणे लावा. तसेच चेहरा आणि मानेला वरच्या बाजूस मसाज करा, ज्यामुळे रक्ताभिसरण वाढेल.

डार्क सर्कल – जर एखाद्याला डार्क सर्कलची समस्या असेल तर आय क्रीम लावा. लक्षात ठेवा की या भागाला अतिशय हलक्या हाताने मसाज करा. तसेच, डोळ्यांशी थेट संपर्क टाळा. आय क्रीम्स नाजूक त्वचेला हायड्रेट करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.

हेही वाचा >> दररोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? डॉक्टर म्हणाले, “कर्करोग…”

सन प्रोटेक्शन – जरी तुम्ही वीकेंड मोडमध्ये असाल आणि फिरायला गेला असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. शेवटी, तुम्हाला SPF 30 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे लागेल. हे त्वचेचे हानिकारक किरणांपासून संरक्षण करते.