Home made hair conditioner: त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश जण ब्युटी पार्लरमध्ये जातात किंवा महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सवर भरपूर पैसा खर्च करतात. नको- नको ते उपाय करूनही समस्या जैसे थेच. केमिकलयुक्त ब्युटी ट्रीटमेंट करण्याऐवजी नैसर्गिक उपचारांची मदत घेण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. कारण यामुळे आपल्या त्वचा व केसांवर दुष्परिणाम होत नाहीत. निसर्गाकडून आपल्याला कित्येक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा खजिना मिळाला आहे. असाच एक केसांसाठी घरगुती हेअर मास्क कसा बनवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॉ रिंकी कपूर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
तुम्हीसुद्धा बाजारात उपलब्ध हेअर कंडिशनर वापरत असाल तर ते आत्ताच थांबवा आणि आवळा-मेथीचा कंडिशनर घरच्या घरी बनवा. चला तर मग पाहुयात या होममेड कंडिशनरचे फायदे आणि हा हेअर कंडिशनर कसा बनवायचा याची पद्धत.
हेअर कंडिशनरचे फायदे
- आवळा व्हिटॅमिन सी आपल्या शरिराला देतो. त्यामुळे केस मजबूत होतात.
- पॉलिफेनॉल हे आवळ्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आहेत, जे तणावाचा सामना करण्यास मदत करतात आणि केसांना नुकसानीपासून वाचवतात.
- आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी हेल्दी स्कॅल्प देऊन केसांच्या वाढीस मदत करते.
- हा कंडिशनर लावल्याने केसांमधील कोंडाही दूर होतो.
- आवळा केसांना नैसर्गिक चमक देण्याचे काम करते.
हेही वाचा >> तुम्हालाही गाडी लागते? मळमळ, उलट्या होतात? मग या २ गोष्टी नेहमी सोबत ठेवा
केस कंडिशनरसाठी साहित्य –
- मेथी दाणे – २ चमचे
- जवस बिया – २ चमचे
- तांदूळ – २ चमचे
- ठेचलेला आवळा- १
- आले – प्रमाणानुसार
- पाणी – प्रमाणानुसार
- एरंडेल तेल – १/२ टीस्पून
- बदाम तेल – १ टीस्पून
- आवळा रस किंवा आवळा पावडर- आवश्यकतेनुसार
घरी केसांचे कंडिशनर कसे बनवायचे
- सर्वप्रथम एका काचेच्या भांड्यात मेथीचे दाणे, जवस दाणे आणि तांदूळ टाका आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
- सकाळी भिजवलेले साहित्य गाळून त्यात ठेचलेला आवळा आणि आले घालून पाणी मिसळा.
- हे सर्व कढीपत्त्यासह पॅनमध्ये ठेवा आणि एक मिनिट उकळवा.
- आता हे मिश्रण गाळून त्यात आवळा पावडर किंवा आवळा रस मिसळा.
- आता त्यात १/२ टीस्पून एरंडेल तेल आणि १ टेबलस्पून बदाम तेल घ
- आता त्याचा चांगली मसाज करा आणि केसांना लावा आणि तासभर राहू द्या मग केस धुवा.