बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कामाचा ताण, अपुरी झोप, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक यासर्वांचा आरोग्यासह, त्वचेवरही परिणाम झालेला दिसून येतो. त्वचेवरील डार्क सर्कल्स, पिंपल्स, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे अशा गोष्टी लपवण्यासाठी मग मेकअपचा आधार घेतला जातो. यापैकी डार्क सर्कल्सच्या म्हणजेच डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळे येण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. डार्क सर्कल्स येण्यामागे कोणत्या गोष्टी करणीभूत ठरतात जाणून घ्या.

डार्क सर्कल्स येण्यामागची कारणं
अपूर्ण झोप, तणाव, ‘विटामिन ई’, ‘विटामिन बी’ ची कमतरता, सतत डोळे चोळण्याची सवय, डिहायड्रेशन, धूम्रपान, अति व्यायाम करणे, हायपरपिगमेंटेशन या कारणांमुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात.

आणखी वाचा : तुम्हालाही रात्री उशीरा जेवायची सवय आहे का? याचा शरीरावर काय परिणाम होतो लगेच जाणून घ्या

डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात जाणून घ्या

एलोवेरा
एलोवेरा लावल्याने पिगमेंटेशन कमी होऊन कोलेजन वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे ‘विटामिन ई’ची कमतरता भरून निघते, त्यामुळे डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवण्यासाठी एलोवेरा फायदेशीर मानले जाते.

थंड दूध
थंड दूधही पिगमेंटेशन कमी करून कोलेजन वाढण्यासाठी कायदेशीर मानले जाते. यासाठी कापसाचा बोळा थंड दुधात बुडवून तो चेहऱ्यावर लावावा.

केळ्याची साल
केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम असते, ज्यामुळे रक्ताभिसरण वाढू शकते. यासाठी केळ्याची साल डोळ्यांखाली चोळा. यामुळे रक्ताभिसरण होण्याचा वेग वाढून डार्क सर्कल्सपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल.

आणखी वाचा : तुम्हीही रोज हेअर ड्रायर वापरता का? याचा शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या

बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसामध्ये विटामिन ए, बी आणि सी आढळते, तसेच जे कोलेजन वाढवण्यासाठीही फायदेशीर मानले जाते. हे सर्व गुणधर्म त्वचेवरील काळसरपणा कमी करण्यास आणि त्वचेचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जातात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader