हवामानातील बदल, प्रदूषण, योग्य आहार न घेणे यांमुळे केसांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. हिवाळ्यात तर केस अधिक कोरडे होण्याची शक्यता असते, त्यामुळे केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण तरीही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासुन मजबुत करणे गरजेचे असते. यासाठी केसांना तेल लावले जाते, यासाठी काहीजण गरम तेलाचा वापर करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गरम तेल केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. गरम तेल लावणे केसांसह शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

केसांना गरम तेल लावण्याचे फायदे:

आणखी वाचा: ‘ही’ आहेत हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होण्याची कारणं; लगेच करा बदल

टाळूच्या रक्ताभिसरणाला गती मिळते
जेव्हा केसांना गरम तेल लावले जाते, तेव्हा त्यांची उष्णता केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते. यामुळे क्युटिकल स्केल उघडण्यास व रक्ताभिसरण होण्यास मदत मिळते. यामुळे तणाव कमी होण्यासह केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

आनंदी हॉर्मोन्स निर्माण होतात
केसांना गरम तेल लावल्याने केसांसह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. केसांना गरम तेल लावल्याने आनंदी हॉर्मोन्स निर्माण होतात, ज्यामुळे मानसिक आरोग्य नीट राहण्यास मदत मिळते.

टाळूच्या इन्फेक्शनपासून सुरक्षा करते
केसांना गरम तेल लावल्याने ते केसांमधील सीबममध्ये मिसळले जाते, जे केसांमधील आवश्यक ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते. यामुळे टाळूच्या इन्फेक्शनपासून सुरक्षा मिळते.

आणखी वाचा: कापलेली फळं ‘या’ पद्धतीने साठवल्यास खुप दिवसांपर्यंत राहतील ताजी; जाणून घ्या साठवण्याची योग्य पद्धत

केसांची वाढ होते
केसांना गरम तेल लावल्याने केसगळती कमी होऊन, केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तसेच यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यातही मदत मिळते.