Hair Coloring Beauty Tricks : अनेक जण पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा केसांना रंग देण्यासाठी केसांना मेहंदी लावतात पण अनेकांना माहिती नसते की मेहंदी नेमकी कशी भिजवायची? किंवा मेहंदी भिजवण्याची उत्तम पद्धत कोणती आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये केस काळेभोर होण्यासाठी मेहंदी कशी भिजवायची, याविषयी सांगितले आहे. (Beauty Tricks how to soak mehendi for hair coloring watch best trick)

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

  • सुरुवातीला एक पातेलं घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी टाका. हे पाणी गरम करा. त्यात चहापत्ती टाका आणि चांगल्याने उकळून घ्या.
  • त्यात तुम्ही मेथी दाणे सुद्धा टाकू शकता.
  • मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी भांड्याचाच वापर करायचा.
  • लोखंडी कढईत तुम्ही आणलेली मेहंदी टाका आणि त्यात चहापत्तीचे पाणी टाकून मेहंदी भिजवून घ्या. त्यानंतर रात्रभर ही मेंहदी भिजवून ठेवा.
  • सकाळी मेहंदी केसांना लावण्यापूर्वी तुम्हाला जर सिल्की केस हवे असेल तर त्यात अंडी टाका.
  • जर तुम्हाला अंडी आवडत नाही तर तुम्ही दही सुद्धा टाकू शकता. त्यानंतर केसांना नीट मेहंदी लावा आणि तीन ते चार तासांनी धुवून काढा.

हेही वाचा : ‘या’ हार्मोन्समुळे वाढते तुमचा चेहरा अन् पोटावरील चरबी; अतिरिक्त चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी काय कराल? डॉक्टरांनी सुचवले ‘हे’ उपाय

ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर
Milk or Curd face pack Ideas
Face Pack: दही की दूध? चेहऱ्याला लावताना बेसनाच्या पिठात नक्की काय मिसळावे? मग वाचा, ‘या’ टिप्स
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral
Amla kadha benefits
घनदाट केसांसाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

पाहा हा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “केस काळेभोर होण्यासाठी मेहंदी अशी भिजवावी”
प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम आणि युट्युब अकाउंटवरून नवनवीन माहिती सांगतात. याशिवाय ते अनेक भन्नाट जुगाड किंवा ट्रिक सुद्धा सांगतात. सोशल मीडियावर त्यांना हजारो लोक फॉलो करतात आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर भरघोस प्रतिसाद देतात.

यापूर्वी सुद्धा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी फक्त एका जुन्या चाळणीपासून कपडे सुकवण्याचे क्लिप हँगर कसे बनवायचे, हे सांगितले होते. पावसाळ्यात फायदेशीर ठरणारा हा जुगाड अनेक लोकांन आवडला होता कारण पावसाळ्यात कपडे कसे सुकवायचे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.  त्यांच्यासाठी हा व्हिडीओ अत्यंत उपयोगी ठरला.

Story img Loader