आपण दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो. कधी त्या आपल्याला आनंदी करणाऱ्या असतात तर कधी दु:खी. समोर आलेल्या सगळ्या परिस्थितींमध्ये आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी आपण सकारात्मक असणे गरजेचे असते. आता नेहमी उत्साही राहण्यासाठी विविध उपाय आहेतच पण योगासन हाही त्यावरील एक उत्तम उपाय आहे. पाहूया असे कोणते आसन आहे जे केल्याने आपण दिर्घकाळ उत्साही राहू शकतो.

पादविस्तृतासन हे एक बैठकस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना प्रथम जमिनीवर बसावे. नंतर दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घेऊन पसरवावे. श्वास घेत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडावेत. मग दोन्ही पाय जमिनीपासून साधारण एक ते दीड फूट वर घ्यावेत आणि कुंभक करावा. हे आसन करताना आपले पाय आणि आपले हात दोन्ही सरळ रहायला हवेत. या आसनात आपला पार्श्वभाग जमिनीला टेकलेला असतो पण पाय आणि हात मात्र पसरवलेले आणि घट्ट पकडलेले तरंगते असतात. दमल्यासारखे वाटल्यावर श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर घ्यावेत. हे आसन तोलात्मक असल्याने योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. सुरूवातीला दोन्ही पाय उचलून ताठ फाकवलेल्या अवस्थेत ठेवणे अवघड जाते पण हळूहळू सरावाने हा स्थिती घेता येते.

increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
peacocks die of electrical shock in bhadravati city
चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
schools, America, mobile phones,
विश्लेषण : विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेत शाळा आग्रही का? काही राज्ये कायदा करणार?
Sukoon Scheme in Family Courts to settle pending cases of family disputes Pune news
कौटुंबिक न्यायालायात ‘सुकून’ योजना; कौटुंबिक वादाची प्रलंबित प्रकरणे मिटवण्यासाठी प्रयत्न
Senior lawyer Ujwal Nikam appointed to handle Badlapur sexual assault case
बदलापूर लैंगिक अत्याचार खटला चालविण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती
ITR Refund Scam
ITR refund scam: करदात्यांनो रिफंडबाबत मेसेज, ईमेल येत आहेत? नव्या स्कॅमपासून सावधान!
Malaria Causes, Symptoms and Precautions in Marathi This monsoon, use these practical safety tips when travelling to malaria-endemic areas
पावसाळ्यात फिरायला जाताय? मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा

हे आसन नियमित केल्याने आपल्या हातापायांची शक्ती वाढून त्यांना बळकटी येते. गुडघे, पोटऱ्या, मांडय़ा, जांघ, घोटे तसेच गुप्तांगालाही व्यायाम मिळतो. ज्यांना अचानक खोकला किंवा शिंक आल्यावर मुत्रवृद्धीचा विकार जडतो त्यांनी हे आसन जरूर करावे. या आसनाच्या नियमित सरावाने शरीरात शक्तीचा संचार वाढतो. शरीर बलवान होऊन काम करण्याचा उत्साह वाढतो. पाठ, नाभी आणि पोटाला चांगल्याप्रकारे ताण बसल्याने तेथील ग्रंथींचे कार्य चांगले होते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच पाठीला म्हणजेच मज्जारज्जूला व्यायाम मिळतो.

ज्या स्त्री-पुरूषांना संभोगक्रियेचा आनंद मिळत नाही व त्यामध्ये अडचणी येतात त्यांनी हे आसन नियमित करावे. लैंगिक समाधानासाठी आणि चांगल्याप्रकारे संतती प्राप्त होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ज्यांची पोटाची, गुडघ्याची, पाठीची ऑपरेशन झाली असतील त्यांनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. करायला सोपे पण उत्कृष्ट परिणाम साधणारे हे आसन करताना श्वसनाची पथ्ये पाळणे गरजेचे आहे. सुरूवातीला श्वास घेत पायाचे अंगठे पकडावेत. मग श्वास घ्यायचाही नाही आणि सोडायचाही नाही म्हणजेच कुंभक स्थितीत पाय जमिनीपासून उचलावेत आणि नंतर श्वास सोडत पूर्वस्थितीत यावे.