Bedsheet washing tips: धकाधकीच्या दिवसानंतर घरी परतताच लगेच पलंगावर आपलं थकलेलं शरीर टाकावं आणि सुखद अनुभव घ्यावा हे नेहमीच सगळ्यांना वाटत असतं. पण, जेव्हा बेडशीट नुकतीच फ्रेश घातलेली असते तेव्हा त्याच्या सुगंधामुळे तुम्हाला गाढ झोप लागते. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खूप काम असल्याने तुमची बेडशीट बदलायची राहूनच जाते. पण, तुम्हाला हा एक प्रश्न नक्कीच मनात येत असेल की, लोकांनी त्यांच्या बेडशीट किती वेळा धुवाव्यात?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सद्यास्काच्या सह-संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर नव्या खन्ना यांच्या मते, बेडशीट प्रत्येक एक ते दोन आठवड्यांनी धुतल्या पाहिजेत. तरी ज्यांना ॲलर्जी आहे किंवा ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, तसंच ज्यांना खूप घाम येतो, त्यांनी आठवड्यातून एकदा तरी बेडशीट नक्कीच धुतली पाहिजे.

हेही वाचा… Fabulous Lives vs Bollywood Wives फेम शालिनी पासीने सांगितली डाएटमधली ‘ही’ सीक्रेट गोष्ट, घरोघरी असणाऱ्या या गोष्टीचा होतो आरोग्याला फायदा, तज्ज्ञ सांगतात…

वारंवार साफसफाई केल्याने स्वच्छता आणि झोपेचे वातावरण ताजेतवाने राहण्यास मदत होते, कारण बेडशीट्सवर कालांतराने घाण, तेल आणि सूक्ष्मजीव जमा होऊ शकतात.

“बेडशीट न धुतल्याने घाम, मृत त्वचेच्या पेशी (dead skin cells), धुळीचे कण, बॅक्टेरिया आणि इतर ॲलर्जी निर्माण होऊ शकतात.जर बेडशीट अशीच न धुता वापरली तर या बॅक्टेरियामुळे त्वचेची जळजळ, मुरूम, ॲलर्जी आणि श्वसनाच्या समस्या होऊ शकतात असं खन्ना म्हणाल्या. त्यांच्या मते, स्वच्छ बेडशीट असल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.

हेही वाचा… Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा

बेडशीट धुताना अनेकदा लोक एक सामान्य चूक करतात, ती म्हणजे लोक बेडशीट नेहमी थंड पाण्याने धुतात आणि यामुळे जंतूंचा नाश होऊ शकत नाही. तसेच काही लोक वॉशिंग मशीनमध्ये जास्त चादरी टाकून गर्दी करतात आणि यामुळे कोणत्याही चादरीची नीट स्वच्छता होत नाही असं खन्ना म्हणाल्या.

बेडशीटची योग्य काळजी घेण्यासाठी टिप्स

तुमची बेडशीट खरोखरच स्वच्छ आणि चांगली आहे याची खात्री करण्यासाठी खन्ना यांनी पुढील गोष्टी सुचवल्या:

गरम पाणी वापरा : शक्य असेल तेव्हा बॅक्टेरिया घालवण्यासाठी बेडशीट्स गरम पाण्याने धुवा.

जास्त प्रमाणात डिटर्जंट आणि फॅब्रिक सॉफ्टनर टाळा : जास्त प्रमाणात डिटर्जंट किंवा सॉफ्टनर वापरल्याने कालांतराने शीटमध्ये शोषण होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

पूर्णपणे कोरडे करणे : बुरशी आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी वापरण्यापूर्वी चादर पूर्णपणे कोरडी असल्याची खात्री करा.

सूचनांचे अनुसरण करा : प्रत्येक फॅब्रिकसाठी असलेलं लेबल आणि वॉशिंग गाईडलाईन्स तपासा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bedsheet washing tips how many times you should wash your bedsheets dvr