मधमाशा म्हटलं की, सर्वांना मधाचं पोळ आणि त्याभोवती घोंगावणाऱ्या माशा आठवतात. फुलांमधील रस शोषून घेऊन मधाचं पोळ मधमाशा तयार करतात. पण तुम्ही कधी फंटा पिणाऱ्या मधमाशा पाहिल्या आहेत का? सध्या फंटा पिणाऱ्या मधमाशांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क होत आहे. हा व्हिडीओने देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही भूरळ घातली आहे.

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर रोज काही ना काही शेअर करत असतात. ते आपल्या व्हिडीओद्वारे लोकांना जागरुक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर लोक चकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दोन मधमाश्या फंटाच्या बाटलीचे झाकण उघडून सर्वांना चकित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मधमाशांनी फुलं सोडून फंटा प्यायला सुरुवात केली आहे का? असा प्रश्न लोकांना पडत आहे.

हेही वाचा – अचानक अंगावर धावून आली मगर, आजोबांनी मारला पॅन; पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral


व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन मधमाश्या एकत्रपणे फंटाचे झाकण कसे उघडत आहेत हे दिसत आहे. त्यांचे टीमवर्क पाहून आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन लिहिले की, “या मधमाशांना पाहिल्यानंतर मी थक्क झालो आहे. त्यांची विशेषता म्हणजे ते खूप लवकर शिकतात. टीमवर्कवर विश्वास आहे. यश म्हणजे सामूहिक प्रयत्न. एकट्याने प्रयत्न करून यशस्वी होत नाही.”

हेही वाचा – टेनिस बॉल कसा तयार केला जातो? फॅक्टरी व्हिडीओ दाखवली संपूर्ण प्रक्रिया, एकदा नक्की बघा!

या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लोकांकडून व्ह्यूज मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला ३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिलं आहे की, “तुम्ही अगदी बरोबर आहात सर.” यावर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले आहे ,”हा खूप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ आहे”