Benefits of Beetroot: चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे तुमचे ओठ. प्रत्येकाला आपले ओठ सुंदर गुलाबी असावेत असे वाटते. बर्याचदा हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होते आणि ओठ फुटण्याची समस्या सुरू होते. याचे कारण असे आहे की, हिवाळ्यात हवा कोरडी होते आणि त्याचा स्पर्श त्वचेचा ओलावा कमी करतो. अशा स्थितीत ओठांना हायड्रेट, करण्यासाठी तुम्ही बीटरूटचा वापर करू शकता. यामुळे तुमचे ओठ केवळ हायड्रेटेड राहत नाहीत तर नॅचरल पिंकही होतात.
ओठांसाठी बीटरूट
केमिकलयुक्त प्रॉडक्ट गुलाबी ओठ देण्याचा दावा करतात पण परिणाम मात्र दिसत नाही. तुम्हाला बीट रुट वापरून गुलाबी ओठ सहज मिळविता येऊ शकते. जे लोक बीट खातात त्यांना माहित आहे की, बीटच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला डाग लावतो. त्यामुळे बीटपासून एखादे लिप केअर प्रॉडक्ट बनिवता येऊ शकतो. बीट तुमच्या ओठांना सुंदर गुलाबी रंग तर देतोच त्याचबरोबर ओठांचा रंग आणखी उजळवितो आणि चांगला बनवितो. हा पूर्णपणे नैसर्गिक, केमिकल मुक्त, आणि स्वस्त उपाय आहे. हे ओठांच्या मेकअपसाठी सर्वात चांगला, स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ पर्याय आहे. आज आपण हिवाळ्यात सुंदर ओठांसाठी बीटरूट कशी मदत करतो हे जाणून घेऊया…
आणखी वाचा : Hot Water Bath: थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणार्यांनी व्हावे सावध; ठरू शकते आरोग्यासाठी नुकसानदायक!
ओठांना हायड्रेट करते : हायड्रेशनच्या कमतरतेमुळे आपले ओठ कोरडे आणि फाटके होऊ शकतात. बीटरूटमध्ये हायड्रेटिंग आणि पौष्टिक गुणधर्म आहेत जे त्वचेच्या थरांमध्ये खोलवर जातात आणि ओठांना मॉइश्चरायझेशन देतात. हे ओठांना अतिशय मऊ आणि गुळगुळीत बनवते.
गुलाबी ओठ : तुमचे ओठ डार्क असतील तर तुम्ही बीटरूटचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी बीटरूटचा रस ओठांवर लावा. असे रोज केल्याने तुम्हाला फरक दिसेल. ओठ गुलाबी होण्यास मदत होईल.
मृत त्वचा काढून टाकते : बीटरूट त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज ठेवते. तसेच मृत त्वचा काढून टाकण्यास यामुळे मदत होते. यासाठी नियमितपणे बीटरूटचा रस त्वचेवर तसेच ओठांवर लावा.
ओठांना लवचिक बनवते: बीटरूटमध्ये असे पौष्टिक गुणधर्म आहेत जे ओठांना आतून मॉइश्चराइज करतात. लवचिक ओठ मिळविण्यासाठी बीटरूटचा रस अत्यंत फायदेशीर आहे. ताज्या कापलेल्या बीटरूटचा तुकडा ओठांवर चोळा तुम्हाला झटपट परिणाम दिसू शकतात.