पीठ, डिंक, बुंदीपासून बनवलेले लाडू तुम्ही आजपर्यंत अनेकवेळा खाल्ले असतील, पण बीटरूटपासून बनवलेल्या लाडूची चव कधी चाखली आहे का? काही लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण मी तुम्हाला सांगतो की, हे लाडू फक्त खायला खूप चविष्ट नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. बीटरूटचे सेवन केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया बीटरूट लाडू बनविण्याची सोपी पद्धत तसंच ते बनवण्यासाठी लागणाऱ्या सोप्या टिप्स.
बीटरूट लाडू बनवण्यासाठी साहित्य
- २½ कपबीटरूट (किसलेले)
- खवा १ कप
- दूध पावडर १ कप
- १ कप साखर
- वेलची ½ टीस्पून
- चिरलेले काजू (काजू, बदाम)
- १ कप लिंबाचा रस
( हे ही वाचा: घरच्याघरी बनवा कोकोनट सूप नूडल्स; जाणून घ्या कसे बनवायचे)
बीटरूट लाडू बनवण्याची कृती
बीटरूट लाडू बनवण्यासाठी प्रथम किसलेले बीटरूट, साखर, वेलची आणि दोन कप पाणी एका जाड तळाच्या पॅनमध्ये गरम करा. साखर वितळली की गॅस कमी करून शिजवा. मिश्रणातील ओलावा सुकल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. यानंतर भाजलेला खवा, मिल्क पावडर, चिरलेला काजू आणि लिंबाचा रस यात घाला आज चांगले मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणापासून हव्या त्या आकाराचे लाडू बनवा.