beetroot peel face mask for skin आरोग्यासोबतच आपली त्वचा आणि चेहराही चमकावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: मुली आपल्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत बाजारात विविध प्रकारची उत्पादने मिळतील पण त्यांचे दुष्परिणामही कमी नाहीत. अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांपासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो.
यापैकी एक म्हणजे बीटरूटच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक. बीटरूट हा एक नैसर्गिक घटक आहे जो आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. पण याच्या सालीमध्ये सौंदर्य वाढवण्याचे अनेक गुणधर्म असतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. तुमच्या चेहऱ्याचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही बीटरूटपासून फेस पॅक बनवू शकता.
बीटरूटच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक
बीटरूटच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणतो. यामुळे त्वचेली पोषण मिळते आणि त्वचा चमकते. यामुळे तुमच्या मृत पेशी तर दूर होतीलच पण तुमचा चेहराही चमकेल. बीटरूटची साल नीट स्वच्छ करून एका भांड्यात ठेवा आणि त्यात थोडे पाणी घाला आणि भिजवण्यासाठी ठेवा.
बीटरूट टोनर
बीटरूटची साल धुवून स्वच्छ पाण्यात काही तास भिजवून ठेवा. यानंतर त्यात थोडे गुलाबजल टाकून ते पाणी स्प्रे बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. हे पाणी आपण दररोज टोनर म्हणून वापरू शकता.
हेही वाचा >> तुम्ही खाताय तो गूळ चांगला की भेसळयुक्त? खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
बीटरूट लिप स्क्रब
लाल बीटरूट तुमच्या ओठांचा रंगही लाल करू शकतो. यासाठी बीटरूटची साले धुवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावीत. आता त्यात थोडी साखर मिसळा आणि थोडे गुलाबजल घाला. आता याने ओठांना मसाज करा. यामुळे ओठांची मृत त्वचा निघून जाईल आणि ओठ लाल आणि गुलाबी दिसू लागतील.