असे अनेक विचार माणसाच्या मनात असतात, ज्याचे उत्तर त्याच्याकडे नसते. मात्र, शास्त्रज्ञ जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काही गोष्टी नक्कीच बाहेर येतात. मृत्यूच्या काही मिनिटे आधी माणसाच्या मनात काय सुरु असते किंवा तो कोणत्या गोष्टींबद्दल विचार करतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर नसेल तर आज आपण जाणून घेऊया की मृत्यूपूर्वी माणूस काय विचार करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैज्ञानिकांनुसार, मरणाच्या जवळ पोहोचलेला व्यक्ती आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांचा विचार करत असतो. द सनच्या रिपोर्टनुसार, ८७ वर्षाच्या एका व्यक्तीला फिट यायची. अशाच परिस्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याच्या उपचारासाठी इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम ईईजीची मदत घेण्यात आली. यादरम्यान, हृदयविकाराच्या झटक्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र, या निदान चाचणीमुळे अनवधानाने त्या व्यक्तीचे ब्रेन मॅपिंग करण्यात आले, त्यामुळे मृत्यूच्या १५ मिनिटांपूर्वीचे त्याचे विचार रेकॉर्ड करण्यात आले.

दररोज इतकी मिनिटं सायकल चालविल्याने पोटाची चरबी होणार कमी; अनेक गंभीर आजारांपासूनही मिळेल सुटका

ब्रेन मॅपिंगमध्ये शास्त्रज्ञांना काय माहिती मिळाली?

ब्रेन मॅपिंगच्या वेळी केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये असे दिसून आले की, शेवटच्या टप्प्यात त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याशी संबंधित काही चांगले क्षण आठवत होते. हे रेकॉर्डिंग ईईजीवर झाले. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ३० सेकंदात हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढू लागले आणि तेव्हाच शास्त्रज्ञांनी एक अनोखा तरंग पकडला. या तरंगाचे नाव गॅमा ऑसिलेशन्स आहे. ले लुईव्हिल झेमार विद्यापीठातील न्यूरोसर्जन डॉ. अजमल गेमर यांनी हे संशोधन केले आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की शेवटच्या क्षणी आपला मेंदू स्वप्न पाहण्याच्या अवस्थेत पोहोचतो. शरीरात प्राण नसले तरी मन मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत कार्यरत असते.

या प्रकरणी न्यूरो अँड पेन केअर क्लिनिक गुडगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. भूपेश कुमार म्हणाले, रुग्णाच्या मृत्यूदरम्यान गामा लहरी सर्वाधिक सक्रिय झाल्या. यासोबतच बीटा वेव्हही सक्रिय झाल्याने रुग्णाला चिंता वाटू लागली. यानंतर अल्फा, थेटाही सक्रिय झाली. व्यक्तीची डेल्टा लहर सक्रिय होताच तो गाढ झोपेत गेला. त्या व्यक्तीची गामा लहर खूप जास्त झाल्याने त्याला जुन्या चांगल्या आठवणी आठवू लागल्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before death a person thinks of these things scientists discover shocking information pvp