गायीचे दूध पृथ्वीवरील साक्षात अमृत आहे. हे सर्वोत्तम पेय तसेच खाद्यपदार्थांमध्ये संपूर्ण व सर्वश्रेष्ठ आहाराबरोबरच मौल्यवान औषधही आहे. मनुष्याची शारीरिक, मानसिक तसेच अध्यात्मिक शक्ती वाढविणारी गायीच्या दूधासारखा दुसरा आहार नाही. परंतु दुधाचे सेवन करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्या पुढीलप्रमाणे
१) दूध जास्त वेळ तसेच तीव्र आचेवर गरम केल्याने त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते.
२) फिके दूध पिणे अधिक लाभदायक असते. दूधात साखर मिसळल्याने शरीरातील कॅल्शिमचे प्रमाण कमी होते आणि कफाचे प्रमाण वाढते.
३) दूधात गूळ मिसळून कधीही पिऊ नये, यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते.
४) दमा, जुलाब, मुरडा, पोटदुखी, अपचन, नवा ताप, त्वचाविकार इ. व्याधींमध्ये दूध पिऊ नये. दूध पचण्यास जड असल्यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता आहे.
५) फळे, वरण, आंबट व खारट पदार्थ तसेच मांसाहारी जेवणाबरोबर दुधाचे सेवन करू नये. यामुळे असंख्य रोग उद्भवतात.
६) जेवण आणि दुग्धपान यात कमीतकमी दोन तासांचे अंतर आवश्य असले पाहिजे.

Story img Loader