Weight Loss diet Tips: वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही ग्रुपच्या लोकांना या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. जेव्हा पोट आणि कंबरचेच्या जवळ चरबी वाढली असेल, तर शरीराचं स्वरूप पूर्णपणे बदलतं आणि खराब होतं. लठ्ठपणा हा एक आजार नाहीय. पण लठ्ठपणामुळे अनेक शारिरीक समस्या उद्धवतात. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं. त्यानंतर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, ट्रिपल वेसलच्या समस्या आणि कोरोनरी आर्टरीचा रोग होण्याचा धोका उद्धवतो. त्यामुळे लठ्ठपणावर जितकं नियंत्रण मिळवाल, तेवढं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
सिटिंग जॉबमुळे लठ्ठपणाचा धोका
जी माणसं सामान्यत: सिटिंग जॉब म्हणजेच बसून काम करतात, अशा माणसांचा लठ्ठपणा वेगाने वाढतो. कारण ८ ते १० तासांपर्यंत एक सारख्या समस्येत राहून कंबर आणि पोटाजवळ चरबी वाढण्यास मदत मिळते. कोरोना माहामारीनंतर वर्क फॉर्म होमचं कल्चर वेगानं वाढत आहे. ज्यामुळे लोकांच्या फिटनेसवर परिणाम झाला असून आरोग्य जीवनशैलीही बदलली आहे. अशातच जे लोकं बसून काम करतात, त्यांचं वजन वाढत जातं. अशा परिस्थितीत तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन डाएटमधून दोन गोष्टी काढून टाकल्या, तर वाढत्या वजनाला नियंत्रणात आणू शकता.
या दोन गोष्टींना डाएटमधून बाहेर काढा
१) तेळकट पदार्थ
भारतात तेळकट पदार्थ खाण्याची लाईफस्टाईल जास्त आहे. या कारणामुळे आपल्या शरीरात खूप जास्त चरबी जमा होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असते. जी माणसं बसून काम करतात, त्यांची कॅलरी बर्न होत नाही आणि तिचं रुपांतर फॅटमध्ये होतं. जर तुमची फिजिकल अॅक्टिविटी कमी होत असेल, तर कमीत कमी हेल्दी डाएटच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.
२) स्नॅक्स
जी माणसं सिटिंग जॉब करतात, ती माणसं भूख लागल्यावर चहासोबत बिस्किट आणि स्नॅक्स खाणं पसंत करतात. यामध्ये चिप्स, स्नॅक्स आणि बिस्किटांसारखे अनेक टेस्टी पदार्थ असतात. परंतु, हे पदार्थ तुमच्या शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढवतं. ज्यामुळे वजन वेगाने वाढण्यात मदत होते. त्यामुळे अशा तेळकट पदार्थांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करू नका.