कडुनिंब झाडाचे असंख्य उपयोग आहेत. ती एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. हजारो वर्षांपासून भारतात त्याचा उपयोग केला जातो. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख सर्व रोग निवारिणी तथा आरिष्ट असा केला आहे. कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात. कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात.

कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तमपैकी अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे. जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कडुनिंबाच्या प्रथिनांचा वापर कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी देखील होतो.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

कडुनिंबातील प्रथिने कर्करोगाच्या पेशीवर थेट हल्ला करत नाहीत तर शरीराला रोगप्रतिकारक क्षमता देणार्‍या पेशींना कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करतात. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते. कडूलिंब हे शरीरासाठी लाभदायक आहे.

कडूलिंब अथवा कडुनिंब वा बाळंतलिंब या नवावे ओळखले जाते. भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या देशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये अर्कपादक, निंबक, पारिभद्रक; मराठींत कडूनिंब, बाळंतनिंब; हिंदींत नीम; गुजराथींत लिमडूं आदी नावे आहेत.