कोरफडला कुमारी असेही म्हणतात, म्हणजेच कायम तरुण असणारी अशी ही वनस्पती माणसालासुद्धा तरुण ठेवण्यास मदत करते. ऑक्सिडायझेशन कमी करण्यासाठी कोरफडीचा फार उपयोग होतो. कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही. दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी अगदी कुंडीतसुद्धा आपण याची लागवड करू शकतो. जाणून घेऊयात कोरफडीचे फायदे..
– कोरफडीच्या पानांमधील गर ताजा किंवा सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. सध्या जे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा गर हळद व सैंधव मिसळून घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो.
– मधाबरोबर घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो. भाजल्याने त्वचेवर डाग पडल्यास कोरफडीचा गर चोळल्यास व्रण कमी होतात व शीतलता निर्माण होते. कोरफडीचा रस कडू, शीतल, मूत्रजन्य, बल्य, दाहप्रशमक आहे.
– कोरफडीच्या पाच मिलिलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा. त्यामुळे भूक लागते. शौचास साफ होते.
– कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचाा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो. दम्याने मुलांचे पोट उडते. त्यावर कोरफडीच्या रसात तूप व मध घालून वारंवार चाटवावे. दम कमी होतो. पोट उडणे थांबते.
– नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.
– डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.