cucumber facemask at home: उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. काकडीत ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व असून शरीराला आवश्यक अशा प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम यांची मात्रा असते. काकडीतील के जीवनसत्त्व हाडाच्या बळकटीसाठी उपयोगी आहे. प्रवासादरम्यान अनेक वेळा धूळ,माती उडाल्यामुळे हे धुलीकण चेह-यावर जमा होतात. यामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होऊन त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे चेह-यावर डाग, पुटकुळ्या येतात. तसेच प्रखर उन्हाचा सतत भडीमार झाल्यामुळेही त्वचा टॅन होते. सूर्यामधून बाहेर पडणा-या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभाव सरळ आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे त्वचेच्या मूळ रंगात बदल होऊन त्वचा काळवंडते. तर अनेक वेळा चेहऱ्यावर पिंपल्सही येतात. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी फळभाज्यांमधली काकडी उपयुक्त ठरु शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काकडी एक सुपरफूड आहे ज्यामध्ये ९५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे याच्या सेवनाने तुमचे शरीर आणि त्वचा हायड्रेटेड राहते. काकडीचा वापर त्वचेवर केल्यास त्वचेची जळजळ कमी होते. आज आम्ही तुमच्यासाठी काकडीचा फेसपॅक घेऊन आलो आहोत. काकडीचा फेसपॅक त्वचेला पौष्टिक ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे त्वचेचे लालसरपणापासून संरक्षण होते. हा फेसपॅक लावल्याने तुमची थकलेली आणि निस्तेज त्वचा लगेच ताजेपणाने भरून जाईल, तर चला जाणून घेऊया काकडीचा फेसपॅक कसा बनवायचा.

काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ चमचा कोरफड जेल
  • १/४ टीस्पून किसलेली काकडी

काकडीचा फेसपॅक कसा बनवावा?

  • काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी आधी काकडी घ्या,
  • मग ती धुवून किसून घ्या.
  • त्यानंतर एका बाऊलमध्ये १/४ चमचा किसलेली काकडी घाला.
  • यासोबतच यामध्ये १ चमचा कोरफड जेल देखील घाला.
  • मग तुम्ही या दोन्ही गोष्टी नीट मिसळून पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा काकडीचा फेसपॅक तयार आहे.

हेही वाचा – Kajal for Babies : सावधान! बाळाच्या डोळ्यात काजळ घालत असाल तर… आधी हे वाचा

काकडीचा फेसपॅक कसा लावावा?

  • काकडीचा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.
  • त्यानंतर फेसपॅक घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावा.
  • यानंतर तुम्ही ते चेहऱ्यावर सुमारे १५ मिनिटे लावून वाळवून घ्या.
  • त्यानंतर साध्या पाण्याच्या साहाय्याने चेहरा धुवावा.
  • यामुळे तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल.

त्वचेला डायड्रेटेड ठेवण्याचे काम काकडी करत असून काकडीमुळे चेह-याचा रंग उजळतो. या काकडीचे टोनर करण्यासाठी प्रथम काकडीचे साल काढून काकडी मिक्सरच्या सहाय्याने बारीक करुन तिच्यातील पाणी गाळणीने वेगळे करावे. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन रोज दिवसातून दोन वेळा चेह-यावर शिंपडल्यास चेह-याचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of cucumber how to make face mask at home in summer srk