शामक दावर
नृत्य हे मन, शरीर आणि आत्मा यांच्यासाठी समग्र क्रियाकल्प आहे. नृत्य एक शारीरिक क्रियाकल्प आणि सर्जनशील भावनेच्या माध्यमातून वापरल्याने, निर्माण होणारी ऊर्जा कुशलतेने हाताळण्यास मदत करते. आणि यामध्ये नृत्य आणि परफॉर्मिंग आर्ट कौशल्य, ज्ञान आणि समज विकसित होण्यास मदत होते. नृत्य शिकण्यासोबतच लोक काहीतरी शोधत असतात आणि त्यांना आवडणाऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होतात. ज्या लोकांना अंतर्दृष्टी समजून घ्यायची असते त्यांना स्वत:ला व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळते आणि त्यांचे व्यक्तिमत्व सकारात्मकरित्या परिवर्तित होते.
सध्याच्या काळामध्ये आपला बहुमूल्य वेळ तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया घेते, तेंव्हा नृत्य हा एक असा छंद आहे जेथे एखादी व्यक्ती शिकू शकते, आनंद घेऊ शकते आणि त्याच वेळी काम ही करू शकते. प्रत्येक वर्गामध्ये फिटनेस लेवल, आत्मविश्वास, लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता, सांघिक भावना, सकारात्मक विचार, शिस्त, शरीराची ठेवण असे सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते. डान्स नेहमी स्वच्छ वातावरणात शिकले जाते त्यामुळे मन हि प्रसन्न राहते. प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा ग्रुपकडे सामान लक्ष दिल्याने समानतेची भावना मिळते.
नृत्य शिकत असताना फक्त शारिरीक क्रियाकल्प करत नाहीत तर यामधून आत्मविश्वास वाढतो, रक्त अभिसरण प्रक्रिया सुधारते, मांसपेशि मजबूत होतात आणि वजन वाढते; चांगले समन्वय आणि कौशल्य विकसित होते. नृत्य हे शरीरातील ऊर्जा आणि भावना बाहेर सोडण्याचा एक चांगला मार्ग आहे. जेव्हा आपण नृत्य करतो तेव्हा घाम येतो आणि घामाद्वारे चांगले वाटणारे एन्डॉर्फिन बाहेर उत्सर्जित होते, ज्यामुळे आपल्याला आनंदी वाटते. चांगले संगीत हि मनाला शांती देते. नृत्य हे संगीताला जिवंत रूप देण्याचे काम करते. शिकण्याची पद्धत हि परस्पर संवादात्मक असल्याने शिक्षण प्रक्रिया तणावमुक्त आणि अधिक मजेदार असते.
माझ्यासाठी आरोग्य हि एक मनाची स्थिती आहे आणि फिटनेस हे जगण्याचा मार्ग. तंदुरुस्त शरीरामध्ये निरोगी मन असते. नृत्य संपूर्ण फिटनेस, सहनशक्ती आणि स्नायूंची बळकटी तसेच संपूर्ण शरीरामध्ये ताकद वाढविण्यास मदत करते. यात कार्डियो व्हॅस्क्युलर / एरोबिक फिटनेस, कोर आणि शरीरातील लवचिकतेसाठी स्ट्रेचिंगचा समावेश केला जातो. ग्रुपमध्ये एकत्रितपणे काम केल्याने संघाचे महत्व तसेच सांघिक भावना वाढते. नृत्यासाठी भरपूर सहनशक्ती आवश्यक असते जी शरीर चपळ बनविण्यास मदत करते. अशा प्रकारे नृत्य मधून मनःशांती, एकाग्रता, चपळता, तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत असे अनेक प्रकाचे फायदे होतात.
(लेखक प्रसिद्ध बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक आहेत)