लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबू पाण्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व क आढळते जे हाडे मजबूत करण्यात मदत करते. जेवल्यानंतर लिंबू पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात याबाबत जाणून घेऊया.
१) पोटाशी संबंधित समस्या होत नाही
जेवल्यानंतर गरम पाण्यात लिंबाचे रस टाकून ते प्यायल्याने जेवन पचवण्यात मदत मिळते. लिंबू पाणी अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही. जेवल्यानंतर तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता.
(मुलांची उंची वाढवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश, फरक दिसून येईल)
२) रोगप्रतिकार शक्ती चांगली राहाते
गरम पाण्यात लिंबाचे रस टाकून पिणे शरिरासाठी फायदेशीर ठरते. लिंबूमध्ये जीवनसत्व क असते आणि त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटिइन्फ्लेमेटोरी गुण असतात जे सर्दी, तापापासून आपल्याला सुरक्षित ठेवतात.
३) डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदद करते
लिंबू पाणी शरिरातील टॉक्सिन्स आणि हानीकारक पदार्थ बाहेर काढण्यात मदत करते. म्हणून जेवल्यानंतर लिंबू पाणी प्यायले पाहिजे.
(गर्भवती असताना डॉक्टरांना विचारूनच घ्या ‘ही’ गोळी, सेवनाने बाळाच्या विकासात येऊ शकते बाधा)
४) हृदय चांगले राहाते
जेवल्यानंतर गरम पाण्यात लिंबाचे रस टाकून प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत होऊ शकते. तसेच रक्तदाब देखील नियंत्रणात राहाते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)