Benefits Of Drinking Milk With ghee: तूप हा भारतीय आहारातील अविभाज्य भाग मानला जातो. अगदी पारंपरिक साजूक- नाजूक, पचनास हलक्या पदार्थांपासून ते दमदार बिर्याणी पर्यंत तुपाच्या वापराचे अनेक प्रकार आहेत. आपल्या पूर्वजांनी या तुपाला इतकं महत्त्व दिलं आहे म्हणजे त्याचे काहीतरी विशेष फायदे नक्की असणारच. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि हाडांचे आरोग्य मजबूत करणे ते जवळजवळ प्रत्येक घरगुती उपचारांसाठी तुपाचा वापर करता येतो. वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुपाने बनवलेले पदार्थ चाखले असतील पण तुम्ही कधी कोमट दुधात तूप मिसळून प्यायला आहात का? हे कदाचित विचित्र कॉम्बिनेशन वाटेल. पण निरोगी आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. चला तर याविषयी आपण तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तूप व दूध एकत्र का प्यावे?

तूप हा अनेक त्रासांपासून सुटका करणारा आयुर्वेदिक उपाय आहे. तर दूध हा कॅल्शियमसह प्रोटिन्सचा समृद्ध स्रोत आहे. या दोन्हीच्या एकत्र सेवनाने सांध्यातील कडकपणा कमी होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारशक्ती सुधारते. पावसाळ्यात विशेषतः शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी व सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी दूध-तूप सेवन फायदेशीर ठरू शकते . इतकेच काय, तूप हे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहे जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यात सुद्धा मदत करते.

कोमट दुधाच्या ग्लासमध्ये एक चमचा तूप टाकल्याने पचन आणि चयापचय सुधारण्यास मदत होते, दूध आणि तुपातील एन्झाईम्स पोषक तत्वांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यासाठी व अन्न पचण्यासाठी मदत करतात. यामुळे नसांना आराम मिळण्यास मदत होते व उत्तम झोप लागते. गर्भवती स्त्रियांना सुद्धा बाळाच्या विकासात मदत करण्यासाठी व शरीराला भरपूर शक्ती देण्यासाठी दुधात तूप मिसळून सेवनाचा सल्ला दिला जातो.

दुधात चांगले फॅट्स, प्रथिने आणि ट्रिप्टोफॅन नावाचे संयुग असते. दुधातील अमीनो ऍसिड झोप येण्यासाठी मदतीचा ठरते. ट्रिप्टोफॅन सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होऊन या हार्मोनच्या मदतीने मज्जातंतूंना आराम मिळतो. त्याशिवाय, सेरोटोनिन शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण वाढवते, जे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.

हे ही वाचा<< झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा

झोपण्याच्या वेळेआधी दूध प्यायल्याने नसा शिथिल होण्यास मदत होते, हे मेलाटोनिनच्या उपस्थितीमुळे होते. इतकेच काय, दुधातील प्रोटिन्समुळे मेंदूच्या GABA रिसेप्टर्सला चालना मिळते, ज्यामुळे चिंता कमी होते आणि चांगली झोप येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of drinking one spoon ghee with warm milk at night how the body changes when you drink every night svs
Show comments