आवळा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा खालल्याने रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहाते, तसेच यात भरपूर प्रमाणात विटामिन सी हे जीवनसत्व आहे जे इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाशी लढण्यात फायदेशीर ठरते. आवळा खालल्याने पाचनतंत्र चांगले राहाते. आवळ्याचे अनेक फायदे आहेत, पण त्यास उपाशी पोटी खालल्याने कुठला लाभ होऊ शकतो याबाबत आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आवळा खाण्याचे फायदे

  • आवळा हा चवीने आंबट आहे. मात्र त्यातील जीवनसत्व, फायबर हे आरोग्य चांगले ठेवते. उपाशी पोटी आवळा खालल्याने पाचनतंत्राशी संबंधित समस्या होत नाही. आवळ्यामध्ये फायबर असते जे पोटाच्या समस्यांपासून आराम देते. तसेच आवळा हे सकाळच्या वेळी सेवन केल्यास ते बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीच्या समस्या दूर करण्यासही मदत करते.
  • आवळ्यात फायबरबरोबरच कॅल्शियम देखील आहे जे हाडे मजबूत ठेवते. आवळा खालल्याने शरीराला कॅल्शियम मिळते ज्याने तुमची हाडे मजबूत राहतात. आवळा हे पोटॅशियमचे देखील एक चांगले स्त्रोत आहे जे स्नायूंसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
  • त्वचा आणि केसांसाठी देखील आवळा फायदेशीर आहे. उपाशी पोटी आवळा खालल्यास केस काळे, दाट आणि चमकदार होऊ शकतात, तसेच त्वचा देखील सुंदर दिसू शकते.
  • आवळा खालल्याने इम्युनिटी चांगली राहाते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आहे जे न केवळ शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढते तर ते फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाशी देखील दोन हात करण्यात मदत करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of eating amla empty stomach in the morning ssb
Show comments