Curry Leaves Benefits : केसगळतीची समस्या वाढून टक्कल होण्याचा त्रास अनेकांना तरूण वयातच जाणवू लागला आहे. यासाठी अनेकदा पुरूष आणि महिला पार्लरच्या पायऱ्या झिजवताना दिसतात. मात्र इतके महागडे उत्पादन वापरूनही योग्य तो रिझल्ट मिळत नाही. केसगळतीची समस्या हमखास बंद होण्यासाठी घरातील काही पदार्थ हमखास उपयोगी ठरतात.कढीपत्ता हा प्रत्येक भारतीय स्वंयपाक घरातील पदार्थ आहे. फक्त चवीसाठीच नाही तर औषधीय गुणांनी समृद्ध असा हा पदार्थ अतिशय लोकप्रिय सामग्रीपैकी एक आहे. हिवाळ्यात केसांवर कोंडा दिसत नाही असे क्वचितच पाहायला मिळते. कढीपत्त्याचे पाणी कोंडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. इतकेच नाही तर कढीपत्त्याचे पाणी केसांना नुकसान होण्यापासून वाचवते.
कढीपत्ता हा शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट गुण असणारा हेल्दी पदार्थ आहे. कढीपत्त्याचे सेवन करणे हे कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर सारख्या बऱ्याच आजारांवर गुणकारी ठरतं. यामध्ये कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फास्फोरस, फायबर कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम आणि लोह सारख्या पोषकतत्वांनी समृद्ध असते. त्यामुळे कढीपत्त्यामधून शरीराला असंख्य फायदे मिळतात.
केसांसाठी फायदेशीर
एखाद्या व्यक्तीचे दररोज ५० ते १०० केस गळणे सामान्य आहे. परंतु, जर तुमचे यापेक्षा जास्त केस गळत असतील तर ते सामान्य नाही. अशा परिस्थितीत कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही यापासून आराम मिळवू शकता. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, कढीपत्त्यामध्ये हिबिस्कसचा अर्क मिसळून लावल्यास केस गळणे कमी होण्यास मदत होते. कढीपत्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट केसांच्या छिद्रांना घट्ट करतात आणि तुमच्या टाळूला मॉइश्चराईझ करतात, ज्यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते आणि केस गळणे थांबते.कढीपत्त्यात असे गुणधर्म असतात ज्यामुळे केस लांब आणि मजबूत होतात. या पानांमध्ये असलेले प्रथिने, व्हिटॅमिन बी 6 आणि बीटा कॅरोटीन केस पातळ होण्यास प्रतिबंध करतात, केसांची मुळे सुधारतात आणि आपल्या केसांच्या एकूण आरोग्यास फायदा देतात.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो
सर्दी, खोकला अशा समस्या आहेत. कफ जास्त असतो. छातीत रक्तसंचय होत असेल आणि सायनुसायटिसची समस्या कायम राहिल्यास कढीपत्ता खूप आराम देतो. छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्याचे काम करते. कॅम्पफेरॉल, व्हिटॅमिन सी आणि ए चे संयुग, त्यात दाहक-विरोधी घटक असतात. हे छातीला आराम देण्याचे काम करते.
हेही वाचा >> महिलांनो ‘हा’ डोसा ठरतोय केसगळतीच्या समस्येवर रामबाण उपाय; वाचाच एकदा पोषणतज्ज्ञांनी सांगितलेली माहिती…
वजन होते कमी
कढीपत्त्याचे सेवन केल्यावर वजन कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होते. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार, कढीपत्ता गायक्लोरोमेथेन, एथिल एसीटेट सारखे तत्व आहेत. जे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
डायबिटिज कंट्रोलमध्ये
ब्लड शुगर कायमच जास्त असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्त्याचे सेवन केल्यावर शरीरातील इन्सुलिनची लेवल सुधारते. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.